सगळ्यात आधी देश, मग कला आणि संस्कृती - मुकेश अंबानी
By admin | Published: October 18, 2016 12:17 PM2016-10-18T12:17:38+5:302016-10-18T12:33:23+5:30
सगळ्यात आधी देशाचा विचार व्हायला हवा. त्यानंतर कला आणि संस्कृतीचा असं स्पष्ट मत रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - पाकिस्तानी कलाकारांवर आणि त्यांच्या चित्रपटांवर घालण्यात आलेली बंदी सध्या चर्चेचा विषय झाला आहे. काही कलाकारांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून काहींनी समर्थन दर्शवलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीदेखील या विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे. 'सगळ्यात आधी देशाचा विचार व्हायला हवा. त्यानंतर कला आणि संस्कृतीचा,' असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
कार्यक्रम ‘ऑफ द कफ’मध्ये सहभागी झालेल्या मुकेश अंबानींना यावेळी पाकिस्तानी अभिनेता आणि अन्य कलाकारांबाबत प्रेक्षकांकडून प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ‘मी एका गोष्टीबाबत अगदी ठाम आहे की, माझ्यासाठी माझा देश पहिला आहे. मी काही बुद्धीजीवी व्यक्ती नाही. त्यामुळे मला या गोष्टी समजत नाही. पण सर्व भारतीयांप्रमाणणे माझ्यासाठी भारत पहिला आहे,' असं उत्तर अंबानींनी यावेळी दिलं.
यावेळी अंबानी यांना तुम्ही राजकारणात उतरणार का ? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. मात्र यावर स्पष्टपणे मी राजकारणासाठी तयार झालेलो नाही सांगत नकार दिला.