‘सहकार कायद्यात पहिली दुरुस्ती डिसेंबरमध्ये’
By admin | Published: September 26, 2015 01:36 AM2015-09-26T01:36:16+5:302015-09-26T01:36:16+5:30
सहकार कायद्यातील ९७ वी घटना दुरूस्ती घाईघाईत झाल्याने त्यात काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास सुरू असून डिसेंबरमध्ये अधिवेशनात पहिली दुरूस्ती मांडण्यात येणार
अहमदनगर : सहकार कायद्यातील ९७ वी घटना दुरूस्ती घाईघाईत झाल्याने त्यात काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास सुरू असून डिसेंबरमध्ये अधिवेशनात पहिली दुरूस्ती मांडण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सहकार कायद्यातील दुरूस्त्या सुचवण्यासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी हिवरेबाजार येथे आयोजित राज्य पतसंस्था फेडरेशनच्या सहकार अदालतमध्ये सांगितले. पाटील म्हणाले, १४ हजार ५०० पैकी ४५० पतसंस्था डबघाईस आलेल्या आहेत. उर्वरित पतसंस्था सुस्थितीत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
मी केवळ घोषणा करणारा मंत्री नसून त्या व्यवहारातही आणतो. दिलेला शब्द पाळणे आवश्यक असल्याचे सांगत पतसंस्थांना कर्ज वसुली करताना आकारला जाणारा सरचार्ज यापुढे आकारण्यात येणार नाही. पगारदार संस्थांना जिल्हा बँकेव्यतिरिक्त अन्य बँकांमधून कर्ज घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)