स्मार्ट पुण्यासाठी ब्रिटनकडून मदतीची पहिली घोषणा

By admin | Published: December 28, 2015 01:54 AM2015-12-28T01:54:18+5:302015-12-28T01:54:18+5:30

स्मार्ट पुण्याच्या दिशेने एक चांगले पाऊल पडले असून, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पुणे शहराला दीड कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा ब्रिटनकडून

The first announcement of help from Britain for Smart Punch | स्मार्ट पुण्यासाठी ब्रिटनकडून मदतीची पहिली घोषणा

स्मार्ट पुण्यासाठी ब्रिटनकडून मदतीची पहिली घोषणा

Next

पुणे : स्मार्ट पुण्याच्या दिशेने एक चांगले पाऊल पडले असून, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पुणे शहराला दीड कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा ब्रिटनकडून करण्यात आली आहे. पुढील ३ महिन्यांत हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना भारतातील पुणे, अमरावती (आंध्र प्रदेश), इंदूर ही तीन शहरे स्मार्ट करण्यासाठी मदतीची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केली. त्याबाबतचे करारही त्या वेळी करण्यात आले.
पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मदतीची तयारी ब्रिटनने दर्शविली आहे.
ब्रिटन राबवित असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांची माहिती महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यासाठी, ब्रिटनचे शिष्टमंडळ लवकरच पुण्यात
येणार आहे. (प्रतिनिधी)
केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी अंतर्गत १०० शहरांची निवड केली आहे. त्यामधून पहिल्या टप्प्यासाठी १० ते २० शहरे स्पर्धात्मक पद्धतीने निवडली जाणार आहे. याकरिता पुणे पालिकेने आपला आराखडा नुकताच केंद्र शासनाकडे पाठविला
आहे.
येत्या २६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातील स्मार्ट शहरांची निवड जाहीर केली जाणार आहे. पहिल्या
टप्प्यात पुण्याची निवड
निश्चित मानली जात आहे. ही निवड जाहीर होण्यापूर्वीच पुण्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेली पीएमपीच्या व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी बसचे मार्ग, त्या मार्गावरून धावणाऱ्या बस, त्यांचे वेळापत्रक यासह सर्व प्रकारची तपशीलवार माहिती असलेले अ‍ॅप विकसित करणे.
क्षेत्रनिहाय विकास योजनेअंतर्गत मॉडेल एरिया म्हणून निवडण्यात आलेल्या औंध, बाणेर, बालेवाडीमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयोग राबविणे, याकरिता या निधीचा वापर करता येणार आहे. मदतीचा हा पहिला टप्पा असून, यापुढेही पुणे शहरासाठी मदत दिली जाणार आहे, असे ब्रिटन सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: The first announcement of help from Britain for Smart Punch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.