हापूस आंब्याची पहिली पेटी एपीएमसीमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:27 AM2018-11-06T06:27:44+5:302018-11-06T06:27:47+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी विक्रीसाठी आली आहे. रत्नागिरीमधून २१ डझन आवक झाली आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी विक्रीसाठी आली आहे. रत्नागिरीमधून २१ डझन आवक झाली आहे.
बाजार समितीमधील व्यापारी प्रमोद पाटे यांच्याकडे देवगडवरून १२ डझन आंबा विक्रीसाठी आला आहे. रत्नागिरीतील शेतकरी उदय नरवडकर यांनी ९ डझन आंबा विक्रीसाठी आणला आहे. मार्केटमध्ये साधारणत: डिसेंबर ते जानेवारीमध्ये मुहूर्ताची पेटी विक्रीला येते. पहिल्यांदा दिवाळीमध्ये आंबा विक्रीसाठी आल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सोमवारी पहिल्या पेटीची विधिवत पूजा करण्यात आली. अद्याप आंब्याची विक्री झाली नसली, तरी साधाणत: दीड ते दोन हजार रुपये डझन दराने आंबा विकला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाजार समितीतील व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी सांगितले की, या वर्षी पहिली पेटी लवकर आली असली, तरी आंब्याचा नियमित हंगाम फेब्रुवारीअखेर व मार्चमध्येच सुरू होणार आहे.