हृदय प्रत्यारोपण झालेल्या मुलीला ‘फर्स्टक्लास’

By admin | Published: May 31, 2017 04:03 AM2017-05-31T04:03:52+5:302017-05-31T04:03:52+5:30

मुंबईत मंगळवारी ५०वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेने गेल्या दीड वर्षात तब्बल ५० जणांना जीवनदान

'First Class' to the heart transplant girl | हृदय प्रत्यारोपण झालेल्या मुलीला ‘फर्स्टक्लास’

हृदय प्रत्यारोपण झालेल्या मुलीला ‘फर्स्टक्लास’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मंगळवारी ५०वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेने गेल्या दीड वर्षात तब्बल ५० जणांना जीवनदान दिले आहे. शहरात ५०वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली त्याच दिवशी हृदयप्रत्यारोपण झालेल्या स्वीडेन डिसोझा हिने बारावीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवला. स्वीडेन ही पहिली लहान मुलगी आहे, जिच्यावर जानेवारी २०१६मध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
विक्रोळी येथे राहणाऱ्या स्वीडेन हिला बारावीत ६३.३८ टक्के गुण मिळाले आहेत. स्वीडेनला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा आजार झाला होता. त्यामुळे हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडल्यावर जीवनदान मिळाले होते. स्वीडेनला पुढे बीएमएस करायचे आहे. हृदयविकारामुळे ती आठ महिने अभ्यास करू शकली नव्हती. पण, शस्त्रक्रियेनंतर तिने अभ्यास सुरू केला. आता तिला बीएमएस पूर्ण करून नोकरी करायची आहे.

Web Title: 'First Class' to the heart transplant girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.