पहिल्या दिवशी 14 हजार विद्याथ्र्यानी घेतला प्रवेश
By admin | Published: June 30, 2014 11:47 PM2014-06-30T23:47:27+5:302014-06-30T23:47:27+5:30
पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्याथ्र्याना येत्या 2 जुलैर्पयत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
Next
>पुणो : इयत्ता अकरावीसाठी पुणो व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रतील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 14 हजार विद्याथ्र्यानी प्रवेश घेतला, तर विविध कारणांमुळे 49 विद्याथ्र्याना प्रवेश नाकारण्यात आला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्याथ्र्याना येत्या 2 जुलैर्पयत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेण्यास सुरुवात झाली. या वर्षीपासून पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्येही उत्सुकता आहे. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्याथ्र्यासह पालकांनीही सकाळपासूनच गर्दी केली होती. काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी रांगाही लागल्या होत्या. मात्र, प्रवेश निश्चित असल्याने विद्याथ्र्याच्या चेह:यावर कसलाही ताण जाणवत नव्हता. त्यामुळे कोणत्याही गोंधळ आणि गडबडीशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू होती. काही विद्याथ्र्याकडून ऑनलाईन अर्ज भरताना झालेल्या चुकांमुळे त्यांना प्रत्यक्ष प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेशावेळी मूळ कागदपत्रंच्या पडताळणीवेळी या चुका निदर्शनास येत होत्या. त्यामुळे प्रवेश न मिळालेले विद्यार्थी निराश झाले. मात्र, दुस:या गुणवत्ता यादीत या विद्याथ्र्याचा विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला.
दरम्यान, पहिल्या यादीतील 14 हजार 258 विद्याथ्र्यानी महाविद्यालयांमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित केला. प्रवेशावेळी 49 विद्याथ्र्याना प्रवेश नाकारण्यात आला. काही विद्याथ्र्यानी ऑनलाईन अर्ज भरताना चुका केल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे प्रवेशावेळी सादर करता आली नाहीत.
तसेच, अन्य कारणांमुळे या विद्याथ्र्याना प्रवेश घेता आला नाही. तर 2क् विद्याथ्र्यानी पहिल्या यादीत निश्चित झालेला प्रवेश रद्द केला आहे. पहिल्या यादीनुसार अद्याप 34 हजार 61क् विद्याथ्र्यानी प्रवेश
घेणो बाकी आहे. त्यांना 2
जुलैर्पयत प्रवेश घ्यावा लागणार
आहे. प्रवेश न घेतलेले विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
प्रवेशाची संधी हुकली
पुणो : शिक्षकेतर सेवकांच्या काम बंद आंदोलनाचे कारण देत तृतीय वर्ष बी.कॉम.च्या गुणपत्रिका देण्यास स.प. महाविद्यालयाने विलंब केल्याने प्रवेशाची संधी हुकल्याचा आरोप विद्याथ्र्यानी केला.
पुणो विद्यापीठाने दि. 23 जून रोजी बी.कॉम.च्या तृतीय वर्षाचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. त्यानंतर गुणपत्निका महाविद्यालयातून दिल्या जातात. मात्न, मागील सहा दिवसांपासून महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा:यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महाविद्यालयाने विद्यापीठातून मूळ गुणपत्रिका आणल्या नाहीत. प्रवेश हुकल्याची बाब विद्याथ्र्यांनी प्राचार्याच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महाविद्यालयाने सोमवारी विद्यापीठातून निकाल आणण्याची घाई करून विद्याथ्र्याना गुणपत्रिकांचे वाटप सुरू केले. याबाबत प्राचार्य पद्मजा घोरपडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
मार्कलिस्ट मिळाले;
पण इंटेरियर डिझाइनिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची मुदत संपली. आता मार्कलिस्ट मिळून काहीच
उपयोग नाही.
- सागर ननवरे
काही महाविद्यालयांत विधी अभ्यासक्रमासाठी प्रथम येणा:यास प्रथम प्रवेश दिला जातो. त्या ठिकाणी प्रवेश फुल झाले आहेत. मार्कलिस्ट उशिरा मिळाल्याने विधी शाखेला प्रवेश घेऊ शकत नाही.
- विक्रम पाटील