मुदतवाढीनंतर पहिला दिवस गोंधळाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:01 AM2017-08-02T04:01:59+5:302017-08-02T04:02:01+5:30

पीकभरण्याला सोमवारी रात्री मुदतवाढ देण्यात आली असली तरी हा आदेश मराठवाड्यात पोहचायला चक्क मंगळवारची सायंकाळ उजाडली.

The first day after the expiry of the deadline | मुदतवाढीनंतर पहिला दिवस गोंधळाचा

मुदतवाढीनंतर पहिला दिवस गोंधळाचा

Next

औरंगाबाद : पीकभरण्याला सोमवारी रात्री मुदतवाढ देण्यात आली असली तरी हा आदेश मराठवाड्यात पोहचायला चक्क मंगळवारची सायंकाळ उजाडली. काही ठिकाणी तो दुपारी, तर काही ठिकाण हा आदेश पोहचलाच नाही. त्यामुळे मुदतवाढीनंतरचा पहिला दिवस गोंधळातच गेला.
बीडमध्ये हा आदेश दुपारी पोहोचला. जिल्ह्यात सोमवारपर्यंत ४ लाख ३ हजार शेतकºयांनी पीकविमा भरल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयांना विमा न भरताच आल्या पावली परतावे लागले.
हिंगोलीत राष्ट्रीयीकृत बँकांना तो दुपारनंतरच मिळाला. लातुरातही आदेश मिळायला दुपार उजाडली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध बँकांसमोर शेतकºयांच्या पुन्हा रांगा लागल्या. उस्मानाबादेत आदेश मंगळवारी दुपारी बँकांना प्राप्त झाले़ मात्र, रात्रीच शासनाकडून अधिकृत घोषणा झाल्याने सकाळपासूनच पीकविमा हप्ता स्वीकारणे सुरू होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़
परभणी अपवाद ठरले. येथे सकाळपासूनच सुरळीत कामकाज चालले. मुदतवाढीचा आदेश मिळाला नसल्याचे जालना जिल्ह्यातील परतूर, केदारखेडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखेत पीकविमा स्वीकारला गेला नाही. औरंगाबाद तालुक्यामधील बँकांना पीकविमा मुदतवाढीचे आदेश उशिरा प्राप्त झाल्यामुळे काही बँकांत वाट बघून कंटाळलेल्या शेतकºयांनी पीकविमा न भरताच घर जवळ केले, तर काही ठिकाणी तुरळक अर्ज स्वीकारण्यात आले.

Web Title: The first day after the expiry of the deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.