अकरावी आॅनलाइनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी गोंधळ

By admin | Published: June 17, 2017 12:57 AM2017-06-17T00:57:17+5:302017-06-17T00:57:17+5:30

अकरावी आॅनलाइन प्रवेश परीक्षेचा दुसरा टप्पा शुक्रवार, १६ जून रोजी सुरू झाला. विद्यार्थ्यांनी सकाळपासून संकेतस्थळाला भेट देण्यास सुरुवात केली.

On the first day of the second phase of the 11th Annual chaos | अकरावी आॅनलाइनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी गोंधळ

अकरावी आॅनलाइनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी गोंधळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश परीक्षेचा दुसरा टप्पा शुक्रवार, १६ जून रोजी सुरू झाला. विद्यार्थ्यांनी सकाळपासून संकेतस्थळाला भेट देण्यास सुरुवात केली. सकाळी संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले, पण दुपारी ३ नंतर संकेतस्थळ नियमित सुरू झाल्याने, पालक आणि विद्यार्थ्यांनी निश्वास सोडला. दुपारनंतर संकेतस्थळ सुरळीत सुरू होते.
यंदा पुन्हा नव्याने अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पूर्णत: अकरावीचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याने, विद्यार्थी आणि पालक सतर्क
होते. अर्ज भरण्याचा पहिला
टप्पा या आधीच विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे.
शुक्रवारपासून गुण, महाविद्यालयाचा पसंतीक्रम असा दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्याच्या अर्ज भरण्याची सुरुवात दुपारी ३ वाजल्यापासून होणार होती, पण याविषयी अनेकांना माहिती नसल्याने, सकाळपासून विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचे, शिक्षण विभाग उपसंचालक कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.
संध्याकाळपर्यंत संकेतस्थळ व्यवस्थित सुरू होते. आत्तापर्यंत १ लाख ७५ हजार जणांनी अर्ज पूर्ण केले असल्याचे उपसंचालक कार्यालयातर्फे माहिती देण्यात आली.

शुक्रवारी ५ वाजेपर्यंत
बोर्डनिहाय आकडेवारी
सीबीएसई - ४,८९४, आयबी - ४, एनआयओएस - ३५७, आयजीसीएसई ८२७, इतर -३७०, एसएससी - १,६०,२३६, आयसीएसई - ८,७८१
एकूण - १,७५,४६९

Web Title: On the first day of the second phase of the 11th Annual chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.