बिले थकविल्याने पहिला डिजिटल जिल्हा ‘आॅफलाइन’

By admin | Published: May 25, 2017 01:57 AM2017-05-25T01:57:55+5:302017-05-25T01:57:55+5:30

राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूरची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ७६९ ग्रामपंचायती वायफायने कनेक्ट करण्यात आल्या होत्या

First Digital District 'Offline' Tired of Bills | बिले थकविल्याने पहिला डिजिटल जिल्हा ‘आॅफलाइन’

बिले थकविल्याने पहिला डिजिटल जिल्हा ‘आॅफलाइन’

Next

मंगेश व्यवहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून शासनाने नागपूरची घोषणा केली होती. जिल्ह्यातील ७६९ ग्रामपंचायती वायफायने कनेक्ट करण्यात आल्या होत्या. या तंत्रज्ञानामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यातील डोंगरगाव, बेलदा व ब्राह्मणी येथील शेतकरी, महिला बचत गट व विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. मात्र बीएसएनएलची देयके थकविल्यामुळे सध्या जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं.चे वायफाय बंद पडले आहे.
राष्ट्रीय आॅप्टिकल फायबर नेटवर्क प्रकल्पांतर्गत २०१४ मध्ये नागपूरची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली होती. शहरासह १३ तालुक्यांमध्ये एकूण १६०० किमी आॅप्टिकल फायबर केबल टाकून ग्रामपंचायतींना कनेक्ट करण्यात आले होते. ३० कोटींच्या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतसह प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळेसह अन्य संस्था व नागरिकांना दर्जेदार इंटरनेट सुविधा उपलब्ध झाली होती. त्यामुळे लोकांना अनेक सेवा रांगा न लावता आॅनलाइन मिळत होत्या.
दरम्यान, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही यंत्रणा फार काळ टिकू शकली नाही. आज जिल्ह्यातील ४४९ ग्रा.पं. चे वायफाय बंद पडले आहे. बीएसएनएलच्या माध्यमातून पुरविण्यात आलेली ही सेवा बिल थकीत असल्याने ठप्प आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून आकडेवारीनुसार १४ एप्रिलपर्यंत ३०५ ग्रा.पं.मध्ये ही सेवा सुरू होती. या ग्रा.पं.वरसुद्धा बिल थकीत होते. त्यामुळे आज यातीलही अनेक ग्रा.पं. ची वायफाय सेवा बंद पडली असल्याची माहिती आहे.

Web Title: First Digital District 'Offline' Tired of Bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.