पहिली उत्कृष्ट रेक रविवारपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 05:40 AM2018-11-04T05:40:06+5:302018-11-04T05:40:46+5:30
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसच्या सुविधांच्या दर्जात आमूलाग्र बदल करण्यात आला असून रूपडे बदललेली ही एक्स्प्रेस रविवारपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत हजर होत आहे.
मुंबई - मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसच्या सुविधांच्या दर्जात आमूलाग्र बदल करण्यात आला असून रूपडे बदललेली ही एक्स्प्रेस रविवारपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत हजर होत आहे. उत्कृष्ट रेक प्रकल्पांतर्गत हा बदल घडविण्यात आला आहे.
सध्या वापरात असलेल्या विविध रेल्वे गाड्यांच्या डब्यांची रचना बदलणे व त्यामध्ये अनेक नवीन सुविधा सुरू करण्यासाठी व अंतर्गत सजावट बदलण्यासाठी रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये प्रगती एक्स्प्रेसचा समावेश करून सुविधांचा दर्जा वाढविण्यात आला
आहे. अधिक स्वच्छता राखता यावी यासाठी शौचालयामध्ये सिरामिक टाईल्स बसविण्यात आले आहेत.
हवा खेळती राहावी यासाठी खास पद्धतीने खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी डब्यात भरपूर उजेड राहावा यासाठी एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. गाडीच्या डब्यांमध्ये हवेशीर वातावरण राहावे यासाठी नवीन पंखे बसविण्यात आले आहेत. एसी कोचमधील प्रवाशांना माहिती मिळण्यासाठी डिस्प्ले बसविण्यात आले आहेत. प्रत्येक डबा आकर्षक रंगसंगतीद्वारे सजविण्यात आला आहे.
मध्य रेल्वेतर्फे ५ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा (१० रेक) यामध्ये समावेश करण्यात आला असून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.
प्रत्येक रेकमध्ये नवीन सुविधा बसविण्यासाठी ६० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.