1892 साली झाला अॅनिमेशनचा पहिला प्रयोग

By admin | Published: May 4, 2016 07:04 PM2016-05-04T19:04:46+5:302016-05-05T11:22:03+5:30

चित्रांच्या पडद्यावरच्या हालचाली म्हणजे अ‍ॅनिमेशन. फ्रान्समध्ये चार्ल्स इमायली रेनॉड यांनी सर्वप्रमथ अ‍ॅनिमेशनचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला

The first experiment in animation was in 1892 | 1892 साली झाला अॅनिमेशनचा पहिला प्रयोग

1892 साली झाला अॅनिमेशनचा पहिला प्रयोग

Next

चित्रांच्या पडद्यावरच्या हालचाली म्हणजे अ‍ॅनिमेशन. फ्रान्समध्ये चार्ल्स इमायली रेनॉड यांनी सर्वप्रथम अ‍ॅनिमेशनचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. त्यांनी २८ ऑक्टोंबर १८९२ मध्ये पॅरिसच्या म्युसी ग्रीविनमध्ये  Pauvre Pierrot  या पहिल्या अ‍ॅनिमेशनपटाचा खेळ दाखवला. १९ व्या शतकात पाच लाखापेक्षा जास्त लोकांनी हा अ‍ॅनिमेशनपट पाहीला.

विनसॉर मॅकके यांनी बनवलेली  Gertie the Dinosaur (1914) ही जगातील पहिली यशस्वी अ‍ॅनिमेटेड कार्टून फिल्म आहे. या फिल्मपासून पडद्यावरच्या कार्टून्सना एक व्यक्तीरेखा मिळाली. यापूर्वी अ‍ॅनिमेटेड कार्टून्स सफेद आणि काळया रंगाच्या असायच्या.

१९३७ साली डिसनेने  Snow White and the Seven Dwarf या अ‍ॅनिमेटड चित्रपटाची निर्मिती केली. हा जगातील पहिला आवाज असलेला रंगीत अ‍ॅनिमेशनपट आहे. अ‍ॅनिमेशनच्या तंत्रज्ञानात आता बरीच सुधारणा झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अ‍ॅनिमेशपट आता अधिक प्रभावी वाटतात.

Web Title: The first experiment in animation was in 1892

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.