AC लोकल ट्रेनचं पहिलं दर्शन

By admin | Published: April 5, 2016 02:21 PM2016-04-05T14:21:55+5:302016-04-05T17:06:12+5:30

बहुप्रतिक्षित अशा एअर कंडिशन्ड उपनगरीय गाड्या आज मंगळवारी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांचं हे पहिलं दर्शन.

The first glimpse of AC local train | AC लोकल ट्रेनचं पहिलं दर्शन

AC लोकल ट्रेनचं पहिलं दर्शन

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - बहुप्रतिक्षित अशा एअर कंडिशन्ड उपनगरीय रेल्वे गाड्या आज मंगळवारी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांचं हे पहिलं दर्शन. या गाड्यांची चाचणी 16 एप्रिलपासून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर लवकरच त्या मध्यरेल्वेच्या मार्गांवर धावणार आहेत. भारतीय रेल्वेची सुरुवात १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमधूनच झाली. हा ऐतिहासिक दिवस लक्षात घेता १६ एप्रिलपासूनच एसी लोकलची चाचणी सुरू होईल. रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) या एसी लोकलची निर्मिती करण्यात आली आहे.
 
 
या गाड्यांचं तिकिट किती रुपये असेल याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून तिकिट परवडणारे असावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याचे भाडे दिल्ली मेट्रोप्रमाणेच ठरविण्याचा विचार आहे.
 
 
AC लोकलचं अंतरंग
 
 
(सर्व छायाचित्रे - सुशील कदम)

Web Title: The first glimpse of AC local train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.