पहिली द्राक्ष बाग भुईसपाट

By admin | Published: April 27, 2016 06:38 AM2016-04-27T06:38:44+5:302016-04-27T06:38:44+5:30

किल्लारी येथील ७७ वर्षीय शेतकरी गुंडाप्पा माधवराव बिराजदार यांनी १८ एकरावरील ही बाग यंदा जमीनदोस्त केली.

The first grape garden groundnut | पहिली द्राक्ष बाग भुईसपाट

पहिली द्राक्ष बाग भुईसपाट

Next

सूर्यकांत बाळापुरे, किल्लारी (जि. लातूर)
लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम द्राक्ष बाग फुलविणाऱ्या किल्लारी येथील ७७ वर्षीय शेतकरी गुंडाप्पा माधवराव बिराजदार यांनी १८ एकरावरील ही बाग यंदा जमीनदोस्त केली. शिवाय सात एकर डाळींब आणि अडीच एकर केळीवर देखील नांगर फिरविला.
बिराजदार यांनी १९६८ साली किल्लारीच्या माळरानावर जिल्ह्यात द्राक्षबाग फुलवली. जिल्ह्यात पहिल्यांदा द्राक्ष लावणारे आणि निर्यात करणारेही तेच. द्राक्षाचे उत्पादन असो की बेदाण्यांचे. त्यांनी विक्रमांचे इमले रचले. एकरी १२ टन द्राक्षांचे उत्पादन घेण्याचा विक्रमही त्यांचाच. खर्च वजा एकरी तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन त्यांनी इतर शेतकऱ्यांना नगदी पिकांकडे वळविले. लातूरातील प्रयोगशील शेतकरी म्हणून गुंडाप्पा
यांना राज्य शासनाच्यावतीने १९७० साली राज्यपालांच्या हस्ते मुंबईत शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले. परंतु दुष्काळामुळे द्राक्षबागायतदारही अडचणीत आला. बिराजदार यांनी जड अंतकरणाने शेतातील द्राक्ष, डाळींब आणि केळीची बाग मोडून काढली.

Web Title: The first grape garden groundnut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.