आधी पत्नी, मुलाला विष पाजले, मग वार करून स्वत:ला संपवले, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 07:36 AM2023-06-25T07:36:43+5:302023-06-25T07:37:04+5:30

Kolhapur News: गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख, तरुण उद्योजक संतोष वसंत शिंदे (वय ४६, रा. गांधीनगर) यांनी पत्नी तेजस्विनी (३६) व गुलगा अर्जुन (१४) याला विष पाजले आणि स्वतः विष पिऊन चाकूने त्यांचा व आपला गळा चिरून घेत बेडरूममध्ये आत्महत्या केली.

First he poisoned his wife and child, then killed himself by stabbing him, a case of rape was registered | आधी पत्नी, मुलाला विष पाजले, मग वार करून स्वत:ला संपवले, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने कृत्य

आधी पत्नी, मुलाला विष पाजले, मग वार करून स्वत:ला संपवले, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने कृत्य

googlenewsNext

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख, तरुण उद्योजक संतोष वसंत शिंदे (वय ४६, रा. गांधीनगर) यांनी पत्नी तेजस्विनी (३६) व गुलगा अर्जुन (१४) याला विष पाजले आणि स्वतः विष पिऊन चाकूने त्यांचा व आपला गळा चिरून घेत बेडरूममध्ये आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

गडहिंग्लजमधीलच माजी नगरसेविकेने शिंदे यांच्याविरुद्ध एप्रिलमध्ये बेळगाव पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न ते करीत होते. परंतु मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी होती.

प्रतिकूल परिस्थितीत शाखेची पदवी घेतलेल्या संतोष यांनी दहा वर्षांपूर्वी हसूरचंपू येथे अर्जुन रिफायनरी नावाने खाद्यतेल निर्मितीचा कारखाना सुरू केला होता. पुणे, मुंबईसह कोकणातही त्यांच्या खाद्यतेलाला मोठी मागणी होती.

 गडहिंग्लज शहर अटकेसाठी बंद!
घटनास्थळी पोलिसांना डायरी सापडली आहे. त्यात लिहिलेल्या 'सुसाइड नोटमध्ये 'त्या' माजी नगरसेविकेसह चौघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा होती. त्यामुळे जमलेल्या लोकानी 'त्या' चौघांच्या अटकेच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. व्यापारी आणि व्यावसायिकांनीही दिवसभर बंद पाळला.
विज्ञान बेकरी उत्पादनांचा प्रकल्प आणि अर्जुन फिटनेस नावाने अत्याधुनिक व्यायामशाळाही सुरू केली होती. कोट्यवधींची वार्षिक उलाढाल असलेल्या त्यांच्या समूहामुळे हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला होता. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक कुटुंबे विराज फूड्स नावाने सुमारे ४०० उघड्यावर पडली.

Web Title: First he poisoned his wife and child, then killed himself by stabbing him, a case of rape was registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.