मुख्यमंत्री गुरुजींनी घेतला पहिलीचा तास
By admin | Published: June 15, 2016 05:39 PM2016-06-15T17:39:02+5:302016-06-15T18:31:20+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वाघोली येथिल जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेमध्ये पहिल्याच्या मुलांना शिकवले. त्यावेळी ते स्वत आपल्या शालेय आठवणीत रमले
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वाघोली येथिल जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेमध्ये पहिल्याच्या मुलांना शिकवले. त्यावेळी ते स्वत आपल्या शालेय आठवणीत रमले. आज दुपारी साधारण १ वाजण्याच्या सुमारास आज वाघोलीच्या शाळेत पोहचले. त्यावेळी त्यांनी, मुलांनो आपण आज काय शिकलो ! संघटित झाल्यास आपण आपला विकास करु शकतो.... ' कसे मिळेल पाणी.. ही कथा त्यांनी सांगितली आणि ते त्यांच्या शालेय जीवनात रमून गेले. प्रत्येक विद्यार्थीनीशी त्यांनी संवाद साधत प्रश्न जाणून घेतले.
मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आज हवेली तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि २ येथे भेट देऊन इयत्ता पहिली आणि इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, गटविकास अधिकारी संदीप कोहीनकर, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, गट शिक्षण अधिकारी ज्योती परिहार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इयत्ता पहिलीच्या बालभारतीतील 'कसे मिळेल पाणी' ही कथा मुलांना सांगून स्वत:च्या गावातील पाण्याची समस्या व संघटितपणे त्यावरील केलेली उपाययोजना हा संदेश यातून दिला.