बसपाची पहिली यादी जाहीर
By admin | Published: September 20, 2014 02:16 AM2014-09-20T02:16:18+5:302014-09-20T02:16:18+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली.
Next
13 उमेदवार ठरले : उत्तर नागपुरातून गजभिये, दक्षिणमधून लोखंडे
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खा. अॅड. वीरसिंह आणि डॉ. सुरेश माने यांनी पत्रपरिषदेत विदर्भातील 13 उमेदवारांची नावे जाहीर केली.
यामध्ये उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, दक्षिण नागपूरमधून नगरसेविका सत्यभामा लोखंडे, उमरेड-रुक्षदास बन्सोड, भंडारा-देवांगणा गाढवे, अजरुनी मोरगाव-डॉ. भीमराव मेश्रम, तुमसर-मोहाडी- नामदेव ठाकरे, वर्धा-नीरज गुजर, हिंगणघाट-प्रलय तेलंग, आर्वी-दादाराव ऊईके, धामणगाव रेल्वे-अभिजित ढेपे, तिवसा-संजय लवाडे, बुलडाणा-शंकर चौधरी आणि अकोला पूर्व येथून भानोदास कांबळे यांचा समावेश आहे. बसपा महाराष्ट्रातील सर्व जागा स्वबळावर लढणार असून इतर उमेदवारांच्या नावाची यादी चार दिवसात जाहीर केली जाईल, असे डॉ. सुरेश माने यांनी स्पष्ट केले.
मायावतींच्या विदर्भात 10 सभा
बसपाला महाराष्ट्रापासून मोठी अपेक्षा आहे. या निवडणुकीत किमान 25 जागा जिंकून येतील, असा विश्वास बसपा नेत्यांना आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या एकटय़ा विदर्भातच 10 सभा होणार आहेत.