अकरावीची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर
By Admin | Published: August 11, 2016 09:59 PM2016-08-11T21:59:59+5:302016-08-11T21:59:59+5:30
दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना शाखा किंवा विषय बदल करायचा आहे, त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष फेरीची पहिली आॅनलाईन गुणवत्ता
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना शाखा किंवा विषय बदल करायचा आहे, त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष फेरीची पहिली आॅनलाईन गुणवत्ता यादी गुरूवारी रात्री उशीरा
जाहीर झाली. या यादीत ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळाला
असून उरलेल्या ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना दुसºया विशेष फेरीसाठी अर्ज
करावा लागणार आहे.
विशेष गुणवत्ता यादीत अर्ज केलेल्या ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांपैकी ७
हजार ६६७ विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही.
याउलट ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलाची संधी मिळाली आहे.
मात्र केवळ ४० हजार ३२६ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीच्या
महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. याउलट उरलेल्या १९ हजार ६३४
विद्यार्थ्यांना पसंतीक्रमातील पहिल्या तीन महाविद्यालयात प्रवेश
मिळालेला नाही. त्यामुळे दुसºया विशेष फेरीत सुमारे २५ हजारांहून अधिक
विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत प्रवेश मिळाला आहे,
त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन शुक्रवार व शनिवारदरम्यान प्रवेश
निश्चित करायचा आहे. नाही तर हा प्रवेश रद्द होईल. महत्त्वाची बाब म्हणजे
विशेष गुणवत्ता यादीतील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना
याआधीच्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करावा लागेल. शिवाय ज्या
विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नाही, त्यांना इतर
विद्यार्थ्यांप्रमाणे दुसºया विशेष फेरीसाठी अर्ज करता येईल, अशी माहिती
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली.
दुसºया विशेष प्रवेश फेरीत सामील होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना
नव्याने लॉगीन आयडी व पासवर्ड घ्यावा लागणार आहे. शिवाय पुन्हा एकदा
प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज भरावा लागणार आहे. पहिल्या फेरीत अर्धवट
अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीसाठी नव्याने लॉगीन आयडी व
पासवर्ड घेऊन अर्ज करता येईल. लवकरच दुसºया विशेष प्रवेश फेरीचे
वेळापत्रक जाहीर केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
एकूण प्रवेश अर्ज - ६७ हजार ६२७
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी - ५९ हजार ९६०
प्रवेशापासून वंचित विद्यार्थी - ७ हजार ६६७
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी २७ हजार ३८७
दुसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - ७ हजार ९०४
तिसºया पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी - ५ हजार ०३५
शाखानिहाय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या -
कला ४ हजार ७८२
वाणिज्य ३८ हजार ७३२
विज्ञान १६ हजार ४४६
यादीला उशीर, विद्यार्थ्यांचा संताप
अकरावीच्या पहिल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत दूरचे महाविद्यालय
मिळाल्याने अनेक विद्यार्थी नाराज झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची
नाराजी दूर करण्यासाठी प्रशासनाला आॅनलाईनच्या तीन विशेष फेºया घ्याव्या
लागत आहेत. मात्र पहिल्याच विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात
प्रशासनाला उशीर झाला. सायंकाळी पाच वाजता जाहीर होणारी गुणवत्ता यादी
रात्री नऊ वाजेपर्यंत जाहीर झाली नव्हती. परिणामी विद्यार्थ्यांसह
पालकांच्या संतापात भर पडली.