अकरावीची पहिली यादी आज

By admin | Published: July 10, 2017 05:41 AM2017-07-10T05:41:24+5:302017-07-10T05:41:24+5:30

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता सोमवारी जाहीर होणाऱ्या अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीकडे सर्वांचे लक्ष लागले

The first list of eleventh is today | अकरावीची पहिली यादी आज

अकरावीची पहिली यादी आज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता सोमवारी जाहीर होणाऱ्या अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवेशाचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले होते. सोमवार, १० जुलैला सायंकाळी ५ वाजता अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे जाहीर केले आहे.
सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळ अशा तिन्ही बोर्डांचे दहावीचे निकाल यंदा चांगले लागले आहेत. १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे या वेळी पहिल्या गुणवत्ता यादीच्या कटआॅफकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबई विभागात १०० टक्के गुण मिळवणारे १४ विद्यार्थी असून ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान गुण पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १० हजार ९९१ इतकी आहे. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये चुरस असणार आहे. गेल्या वर्षीचा कटआॅफ हा ९३ ते ९४ टक्के इतका होता.
अकरावी प्रवेशासाठी तब्बल २ लाख ३५ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजार ५७५ आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयाचा कटआॅफ या वेळी उच्चांक गाठणार असे चित्र आहे. ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवलेल्यांच्या संख्येत वाढ झाल्याने दुसऱ्या गुणवत्ता यादीचा कटआॅफ किती असेल हे सांगणे कठीण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ११ ते १३ जुलै दरम्यान प्रवेश घेता येणार आहे. १४ जुलैला पसंतिक्रम बदलण्यास मुदत दिली जाणार आहे.
>कला शाखा
सेंट झेवियर्स कॉलेज९४.४%
रामनिवास रुईया कॉलेज ९१.८%
जय हिंद कॉलेज९१.४%
>वाणिज्य
नरसी मुन्शी कॉलेज ९४.५%
एच.आर. कॉलेज ९३.४%
आर.ए. पोद्दार कॉलेज९१.३४%
>विज्ञान
रामनिवास रुईया कॉलेज९३.२%
वझे कॉलेज९२.८%
साठ्ये कॉलेज९२.२%

Web Title: The first list of eleventh is today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.