राज्य मंत्रिपरिषदेची आज पहिली बैठक, काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:51 IST2025-01-16T07:39:35+5:302025-01-16T07:51:37+5:30
मंत्रिपरिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिपरिषदेची आज पहिली बैठक, काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्य मंत्रिपरिषदेची पहिली बैठक गुरुवारी मंत्रालयात होणार आहे.
एरवी नियमितपणे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते असते, पण तीत राज्यमंत्री नसतात. मंत्रिपरिषदेच्या बैठकीला मात्र कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे दोघेही उपस्थित राहतात. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १५ डिसेंबर रोजी फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यावेळी फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी सर्व मंत्री, राज्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर आता आज मंत्रालयात मंत्रिपरिषदेची पहिली बैठक होत आहे.