चोरमलेवस्ती शाळेचा प्रथम क्रमांक

By admin | Published: May 17, 2016 02:20 AM2016-05-17T02:20:05+5:302016-05-17T02:20:05+5:30

चोरमलेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ताविकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या शाळा स्वयंमूल्यमापनात प्रथम क्रमांक मिळाला.

The first number of the school of thieves | चोरमलेवस्ती शाळेचा प्रथम क्रमांक

चोरमलेवस्ती शाळेचा प्रथम क्रमांक

Next


दौंड : चोरमलेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ताविकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या शाळा स्वयंमूल्यमापनात प्रथम क्रमांक मिळाला.
दौंड पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सभापती रोहिणी पवार, सहायक गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी शोभा शिंदे यांच्या हस्ते मुख्याध्यापक कृष्णा कुदळे यांनी प्रमाणपत्र स्वीकारून शाळेला सन्मानित केले.
चोरमलेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राबवलेले उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता व पालकांचा शाळेच्या विकासातील सहभाग यावर आधारित हे मूल्यमापन करण्यात आले. शाळेने वर्षभरात गुणवत्तेसपूरक असे हस्ताक्षर सुधारणा, वर्तमानपत्रवाचन, रद्दीतून शैक्षणिक साहित्य, स्पेलिंग पाठांतर, ज्ञानरचनावादी अध्यापन, परिसर सहली, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले.
शाळेत लोकसहभागातून झेरॉक्स प्रिंटर, लॅमिनेशन मशिन, साउंड सिस्टिम, रंगकाम, बोअरवेल साहित्य, पुस्तके, पेवर ब्लॉक व परिसर सुशोभित करण्यात आले. एक आदर्श शाळा म्हणून नावारूपास येत
आहे. ग्रामस्थांचे व अधिकारी, केंद्रप्रमुख, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्याने शाळेची प्रगती होत असल्याचे मुख्याध्यापक कृष्णा कुदळे व सहशिक्षिका साक्षी कोंडेजकर यांनी सांगितले.
(वार्ताहर)

Web Title: The first number of the school of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.