उसाची पहिली उचल सरासरी २७२५ रूपये

By Admin | Published: November 2, 2016 06:58 PM2016-11-02T18:58:03+5:302016-11-02T18:58:03+5:30

यंदाच्या एकरकमी एफआरपीसह टनास १७५ रुपये जास्त देण्याचा निर्णय बुधवारी येथे झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात

First pickup of sugarcane is 2725 rupees | उसाची पहिली उचल सरासरी २७२५ रूपये

उसाची पहिली उचल सरासरी २७२५ रूपये

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि.02 -  यंदाच्या एकरकमी एफआरपीसह टनास १७५ रुपये जास्त देण्याचा निर्णय बुधवारी येथे झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. त्यास खासदार राजू शेट्टी व यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संमती दिली असल्याने शनिवारपासून कारखान्यांची धुराडी पेटण्याचा मार्ग मोगळा झाला. यंदा पहिलेच वर्ष असे आहे की कोणतेही आंदोलन न होता राज्य सरकारच्याने मध्यस्थी केल्याने ऊसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची शिष्टाई यात यशस्वी ठरली. परंतू जाहीर झालेली उचल ही फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतीच असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने अन्य जिल्ह्यांतील कारखानदार कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य करतात की फक्त एकरकमी एफआरपीच देतात हा औत्सुक्याचा भाग असेल.  तिथे संघटना किती आक्रमक होते हा देखील कळीचा प्रश्र्न असेल.
कोल्हापुर जिल्ह्याची पहिली उचल सरासरी २७२५ रुपये होत आहे.

Web Title: First pickup of sugarcane is 2725 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.