प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य
By admin | Published: June 10, 2014 10:40 PM2014-06-10T22:40:53+5:302014-06-10T23:30:37+5:30
राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आल्यानंतर आता बुधवारपासून शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होणार आहेत.
पुणे: राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आल्यानंतर आता बुधवारपासून शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होणार आहेत.काही नामांकित महाविद्यालयामधील प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्ता यादीनुसार केले जाणार असले तरी काही महाविद्यालयात प्रवेश थेटपणे प्रवेश दिले जाणार आहेत.
गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत गुप्ता म्हणाले,शिक्षण मंडळाने बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केल्यानंतर महाविद्यालयाचे प्रवेश अर्ज महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर भरण्यास उपलब्ध झाले होते.ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये 60 ते 70 टक्के गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास थेटपणे प्रवेश दिले जाणार आहेत. महाविद्यालयात बीएस्सीच्या 480 तर बीए अभ्यासक्रमाच्या 240 जागा आहेत.
गणेश खिंड येथील मॉर्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय खरात म्हणाले,आमच्या महाविद्यालयात बी.कॉम.च्या 600,बी.ए.च्या 320,आणि बीस्सीच्या 240 जागा आहेत. महाविद्यालयातील प्रवेश अर्ज मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.तसेच प्रथम येणा-या विद्यार्थ्याला प्रथम प्राध्यान्य दिले जाणार आहे.
दरम्यान,गरवारे व बीएमसीसी महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एफ.वाय.बी.कॉमर्स मध्ये थेट प्रवेश दिला जणार आहे.तसेच फर्ग्युसन,स.प.आणि बीएमसीसी महाविद्यालयातील प्रवेश केवळ गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत.