विवेक प्रभू केळुस्करांच्या व्यंगचित्राला प्रथम पारितोषिक
By Admin | Published: March 23, 2016 04:06 AM2016-03-23T04:06:36+5:302016-03-23T04:06:36+5:30
महाराष्ट्र सरकारच्या जलसंधारण विभाग आणि कार्टूनिस्ट कंबाइन वेलफेअर असोसिएशनने घेतलेल्या कार्टून स्पर्धेत विवेक प्रभू केळुस्कर या व्यंगचित्रकाराच्या कलाकृतीला पहिले पारितोषिक मिळाले आहे.
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या जलसंधारण विभाग आणि कार्टूनिस्ट कंबाइन वेलफेअर असोसिएशनने घेतलेल्या कार्टून स्पर्धेत विवेक प्रभू केळुस्कर या व्यंगचित्रकाराच्या कलाकृतीला पहिले पारितोषिक मिळाले आहे. तर कपिल घोलप यांच्या व्यंगचित्राला दुसरे व अनीश वाकडे यांच्या व्यंगचित्राला तिसरे पारितोषिक मिळाले आहे. महाराष्ट्राला सलग दुसऱ्या वर्षी भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवा, जलप्रदूषण असे विषय देण्यात आले होते. राज्यभरातून अक्षरश: शेकडो व्यंगचित्रकारांनी उत्कृष्ट व्यंगचित्रे पाठवली. सगळी व्यंगचित्रे इतकी चांगली होती की परीक्षकांचे काम अवघड झाले, अशी भावना कार्टूनिस्ट कंबाइन वेलफेअर असोसिएशनच्या प्रभाकर वाईरकरांनी व्यक्त केली.