माजगावची तेजश्री राज्यात प्रथम

By admin | Published: May 21, 2015 12:50 AM2015-05-21T00:50:47+5:302015-05-21T00:55:54+5:30

मुलांमध्ये शशांक अव्वल : ‘पीएसआय’ परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा

The first in the state of Majhounwi Tejashree | माजगावची तेजश्री राज्यात प्रथम

माजगावची तेजश्री राज्यात प्रथम

Next

माजगावची तेजश्री राज्यात प्रथम
मुलांमध्ये शशांक अव्वल : ‘पीएसआय’ परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा
कोल्हापूर/मांगले : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूर, सांगली व साताऱ्यातील १३ जणांनी जिद्दीला कष्टाची जोड देत यशाचा झेंडा रोवला आहे.
यात मांगले (ता. शिराळा) गावचा सुपुत्र शशांक अशोक कदम याने (३४० पैकी २४६ गुण), तर महिला गटात माजगाव (ता. राधानगरी) येथील तेजश्री विनायक चौगले हिने (३४० पैकी २०५ गुण) राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
पंढरपूरचा गणेश पाटील (२४१ गुण) व अजित बडे (२३७ गुण) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. न्यू शाहूपुरीतील (कोल्हापूर) प्रभा किरण वाशीकर हिने क्रीडागटात प्रथम आणि शिंगणापूर (ता. करवीर) येथील प्रमोद अशोक आवळे याने अनुसूचित जाती गटांतून राज्यात पहिला क्रमांक मिळविला. बुधवारी सायंकाळी परीक्षेचा अंतिम निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर झाला. आयोगातर्फे ‘पीएसआय’च्या २६० पदांसाठी १८ मे २०१४ रोजी पूर्व आणि २१ सप्टेंबर २०१४ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि १६ मार्च ते १३ एप्रिल २०१५ रोजी मुलाखती घेण्यात आल्या.
अन्य यशस्वी उमेदवार असे : (कंसात राहणार, रँक) : महेश भागचंद कवाळे (सम्राटनगर, कोल्हापूर, ९), स्वप्नाली अनिल राजगिरे (जयसिंगपूर, २८), उज्ज्वला लक्ष्मण भिंगुडे (उजळाईवाडी, ता. करवीर, २९), अजित शंकर देसाई (पाटगाव, भुदरगड, ५४), संदीप संभाजी पाटील (कारंडेवाडी, ता. करवीर, ६८), गायत्री गणपतराव पाटील (पाचगाव), अरुण आनंदा बंडगर (लिले, जि. सांगली, २०), आकाश माणिकराव पाटील (इटकरे, जि. सांगली, २५), अभिजित राजेंद्र इंगळे (शिंदी बुद्रुक, जि. सातारा २७).
दरम्यान, आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी नेट कॅफे, इंटरनेटची सुविधा असणाऱ्या ठिकाणी उमेदवारांनी गर्दी केली होती. यशस्वी उमेदवारांवर नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी प्रत्यक्ष भेटून, मोबाईलद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. परीक्षेत शहरातील ए. बी. फौंडेशनच्या अकरा, एन. पी. स्पर्धा परीक्षा केंद्राचे दोन व स्टडी सर्कलच्या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
चिकाटीमुळेच यश : कदम
पहिल्यापासून ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अभ्यास व कष्ट केल्याने हे यश संपादन केले आहे. पहिल्या ‘टॉप फाईव्ह’मध्ये येईन, असा आत्मविश्वास होता. मात्र, पहिलाच आल्याने मला व माझ्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. सध्या पोलीस उपअधीक्षक परीक्षेचीही तयारी करीत असून, त्यामध्येही यश मिळवीन.
मागासवर्गीयांमधून अहमदनगर जिल्ह्यातील पालवे वस्ती येथील अजित बडे हे पहिल्या स्थानी.
एससी संवर्गात अव्वल : स्नेहल चव्हाण, अमोल जाधव, निशा श्रेयकर, पल्लवी जाधव, अपेक्षा मेश्राम, नीलम कांबळे
महिला गट खुला संवर्गातील पहिले तीन उमेदवार : तेजश्री पवार, रागिनी कराळ, नशिपून शेख
महिला गट एन. टी. संवर्गातील अव्वल उमेदवारांची नावे : ज्योती मरकड, विद्या पवार, मयुरी तेलंग.
राज्यात पहिला आलेला शशांक कदम हा वारणानगर येथील विनय कोरे स्पर्धा परीक्षा केंद्राचा विद्यार्थी आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे. शशांकचे वडील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात भूगोल विषयाचे प्राध्यापक होते. ते नुकतेच सेवानिवृत झाले आहेत.
शशांकचे प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण वारणानगरला झाले. त्याने कऱ्हाड येथील दौलतराव अहिर अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणकशास्त्र अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले. त्याला आई-वडिलांसह विनय कोरे स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रा. एस. आर. कुलकर्णी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: The first in the state of Majhounwi Tejashree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.