मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:33 PM2023-07-06T12:33:13+5:302023-07-06T12:34:05+5:30

ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी मागणी अनेकांकडून होत आहे. मनसे नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत चर्चा झाली होती.

First step taken for MNS-Uddhav Thackeray alliance?; Abhijit Panse- Sanjay Raut met | मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट

मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट

googlenewsNext

मुंबई – राज्याच्या राजकीय राजकारणात बऱ्याच उलथापालथी पाहायला मिळत आहे. त्यात आता मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती याबाबत चर्चा सुरू आहे. मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत असे बॅनर्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेत. मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावे अशी मागणी लोकांमध्ये आहेत. त्यात मनसे नेते-ठाकरे गटाचे खासदार यांच्या भेटीमुळे पुन्हा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. उद्धव ठाकरे गट हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. परंतु अजित पवार यांच्या बंडामुळे मविआवर त्याचा परिणाम झाला आहे. संजय राऊत हे ठाकरे गटाचे विश्वासू नेते आहेत. त्यात मनसे नेते अभिजित पानसे यांनी राऊतांची भेट झाल्याने काही राजकीय बेरजेचे गणिते मनसे आणि ठाकरे गटाकडून जुळवण्यात येतायेत का अशी चर्चा सुरू आहे. राजकारणात काही अनपेक्षित राहिले नाही. ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी मागणी अनेकांकडून होत आहे. मनसे नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे पडद्यामागून दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत का अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

या भेटीनंतर अभिजित पानसे यांनी सांगितले की, युतीचा प्रस्ताव घेऊन येण्याइतपत मी मोठा नाही. मी राज ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता आहे. युतीबाबत काही असेल तर त्यावर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच बोलतील. माझ्या वैयक्तिक कामासाठी मी इथं आलो. राजकीय चर्चेचा काही संबंध नाही. राजकारणात मला संजय राऊतांनीच आणले आहे. माझे संजय राऊतांशी फार जुने संबंध आहेत. आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. वैयक्तिक स्वरुपाच्या चर्चा होत्या. ठाकरे पार्ट २ जेव्हा येईल तेव्हा मोठा कार्यक्रम घेऊन घोषणा करू असं त्यांनी सांगितले. दरम्यान, मनसे हा एकमेव पक्ष आहे जो कुठल्याही युती, आघाडीत नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या पाठिशी राज्यातील जनतेने उभे राहायला पाहिजे असं आवाहनही पानसे यांनी केले.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Read in English

Web Title: First step taken for MNS-Uddhav Thackeray alliance?; Abhijit Panse- Sanjay Raut met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.