शिवजयंती : साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी केला हाेता पहिला सर्जिकल स्ट्राईक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 05:53 PM2020-02-19T17:53:15+5:302020-02-19T17:55:23+5:30
साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी पुण्यात सर्जिकल स्ट्राईक करुन पुणे शाहिस्तेखानाच्या तावडीतून साेडवले हाेते.
पुणे : पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरुन सर्जिकल स्ट्राईककरुन आपल्या जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सर्जिकल स्ट्राईक केला हाेता, ताेही 350 वर्षांपूर्वी. ताे भारतातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हाेता.
शाहिस्तेखान पुण्यावर चाल करुन आला हाेता. तब्बल एक लाखाची फाैज घेऊन दिल्लीवरुन ताे आला हाेता. त्याने राहण्यासाठी जागा निवडली ती लाल महालाची. या काळात शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरुप सुटून रायगडावर पाेहाचले हाेते. त्यांना शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात स्वैराचार माजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देत होता.
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला धडा शिकविण्याचे ठरवले. निवडक ४०० मावळ्यांना घेऊन महाराज लालमहालात अतिशय शिताफीने शिरले. त्यामुळे शाहिस्तेखानची धांदल उडाली. या लढाईत शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बाेटे कापली. तसेच या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा आणि त्याची बेगम मृत्युमुखी पडली. याचा शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि ताे अवघ्या तीन दिवसात पुणे साेडून ताे दिल्लीकडे रवाना झाला. ही घटना 5 एप्रिल 1665 राेजी पहाटे 2 ते 4 यावेळेत घडली. अशाप्रकारे शिवाजी महाराजांनी पुणे आणि लाल महाल शाहिस्तेखानाच्या तावडीतून मुक्त केला.