मुंबईत स्वाइन फ्लूचा पहिला बळी, 18 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू
By admin | Published: May 2, 2017 09:52 PM2017-05-02T21:52:39+5:302017-05-02T22:20:25+5:30
मुंबईमध्ये या वर्षीचा स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला आहे. वरळी येथील एका 18 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मुंबईमध्ये या वर्षीचा स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला आहे. वरळी येथील एका 18 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
या चिमुकल्याला 11 एप्रिल रोजी उपचारासाठी भायखळा येथील दाऊद रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सातत्याने ताप आणि उलटीचा त्रास होत असल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे 21 एप्रिल रोजी त्याला नूर रूग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर 25 तारखेला बीएमसीच्या कस्तुरबा गांधी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे उपचार सुरू असताना 28 तारखेला त्याचा मृत्यू झाला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाइन फ्लूच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षी मुंबईत स्वाइन फ्लूचे केवळ 3 रूग्ण आढळले होते तर एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र, यंदा जानेवारी ते 30 एप्रिलपर्यंत 21 रूग्ण आढळले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे.