तपोवनचा किल्ला स्पर्धेत प्रथम
By admin | Published: October 31, 2016 03:33 AM2016-10-31T03:33:03+5:302016-10-31T03:33:03+5:30
यंग स्टार्स ट्रस्ट आयोजीत किल्ले स्पर्धेत विरारच्या तपोवन बंगल्याने साकारलेल्या किल्ल्याला प्रथम पुरस्कार मिळाला.
वसई : यंग स्टार्स ट्रस्ट आयोजीत किल्ले स्पर्धेत विरारच्या तपोवन बंगल्याने साकारलेल्या किल्ल्याला प्रथम पुरस्कार मिळाला. व्दितीय : अष्टविनायक सोसायटी विरार, तृतीय विभागून : एक्स्पर्ट इंटरनॅशनल हायस्कूल व किरिकरा निवास नालासोपारा, उत्तेजनार्थ : स्वरोही कुटीर विरार व एकवीरा विहार विरार, खास : भाऊनगर विरार, खास : सेक्टर ५ वसंत नगरी नालासोपारा स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून तीमध्ये ४२ किल्ल्यांचा समावेश होता. राजगड, सज्जनगड, मुरूडचा जंजिरा, लोहगड , सिंधुदुर्ग, प्रतापगड, सुवर्णगड हे किल्ले स्पर्धकांनी जसेच्या तसे साकारले होते.
भिंती चित्रासाठी स्वच्छ वसई सुंदर वसई हा विषय दिला गेला होता. या स्पर्धेत २८ प्रवेशिका होत्या. प्रथम : यश विद्या निकेतन हायस्कूल विरार, व्दितीय विभागून : ज्ञानदीप विद्यामंदीर वालीव , व्दितीय विभागून : झील शाह, तृतीय : दिशा शिगवण, उत्तेजनार्थ : अनुसया विद्यालय, के.जी. हायस्कूल यांना पुरस्कार मिळाले. यात शिक्षकांनी, शाळांनी विविध सोसायटीमधील भिंतीवर अतिशय उत्कृष्ट चित्रे काढून एक पाऊल निसर्गाकडे एक पाऊल स्वच्छतेकडे, झिंग झिंग झिंगाट कचऱ्यांची लाऊ विल्हेवाट असे अनेक संदेश ही दिले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून जेष्ठ चित्रकार सुभाष गोंधळे यांनी काम पाहिले.