पंधरा वर्षांत प्रथमच जूननंतर पावसाचा दीर्घ खंड
By Admin | Published: July 15, 2015 12:21 AM2015-07-15T00:21:22+5:302015-07-15T00:21:22+5:30
हवामान बदलाचा परिणाम.
राजरत्न सिरसाट/अकोला : मागील पंधरा वर्षांत यंदा प्रथमच जूनमध्ये आलेल्या पावसानंतर प्रदीर्घ खंड पडला आहे. त्यामुळे शेतीवर विपरित परिणाम झाला असून, पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. मागील पंधरा वर्षांत पाऊस लवकर किंवा एकदम उशिरा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अवकाळी व परतीच्या पावसातही बदल झाले आहेत; पण यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली आणि लगेच खंड पडला. मागील पंधरा वर्षात जून ते जुलै महिन्यात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पडलेल्या पावसाची आकडेवारी बघितल्यास १५ जून २00३ पासून ३0 जूनपर्यंत ७५.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर १६ जुलैपर्यंत 0.२ ते 0.५ मिमी पाऊस पडला. म्हणजेच कृषी हवामानशास्त्रज्ञांच्या मते १६ दिवसांचा खंडच होता. मागील दीड दशकात जूनमध्ये पडलेल्या पावसानंतर लगेच एवढा प्रदीर्घ पावसाचा खंड पडला नाही. यंदा पिकाने जमीन सोडली नाही आणि पावसाने दडी मारली आहे. तीन आठवडे झाले आहे. पावसाचे बदललेले हे स्वरू प लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भविष्यात पिके, पाणी आदीचे नियोजन करावे लागणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या पीक पद्धती पर्यावरण केंद्राचे संचालक डॉ. सुभाष टाले यांनी स्पष्ट केले.
पावसाची सर्वात मोठी दडी
वर्ष जून व जुलै खंड (दिवस)
२00८ (जून)----- १0 २00८ (जुलै)----- ९
२0११ (जून)--------८ २0११ (जुलै)------- ५
२0१२ (जून)--------९ २0१२ (जुलै)------ -५
२0१३ (जून)------- ६ २ 0१३ (जूलै)----- -६
२0१४ (जून)-------१७ २0१४(जुलै)------४
२0१५ (जून)------६ २0१५ (जुलै) -----१४