मुंबईत पहिल्यांदाच मोफत सायकल पार्किंग

By Admin | Published: July 14, 2016 07:50 PM2016-07-14T19:50:47+5:302016-07-14T19:50:47+5:30

वाढत्या वाहनांच्या संख्येने मुंबईत वाहनतळाची समस्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण असे तिहेरी संकट आणले आहे़ त्यामुळे सायकल टू वर्कला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत प्रथमच

For the first time free parking in Mumbai | मुंबईत पहिल्यांदाच मोफत सायकल पार्किंग

मुंबईत पहिल्यांदाच मोफत सायकल पार्किंग

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - वाढत्या वाहनांच्या संख्येने मुंबईत वाहनतळाची समस्या, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण असे तिहेरी संकट आणले आहे़ त्यामुळे सायकल टू वर्कला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत प्रथमच विनामूल्य सायकल पार्किंग उपलब्ध करुन देण्याची अभिनव योजना पालिकेने आणली आहे़ पहिल्या प्रयोगात कुलाबा, चर्चगेट, फोट या विभागातील ४७ वाहनतळावर एकूण ४७० सायकलच्या पार्किंगची सोय असणार आहे़
हुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉर्इंट ही सर्वाधिक वर्दळीची ठिकाणं आहेत़ येथील ४७ वाहनतळाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पे अ‍ॅण्ड पार्कच्या देखभालीकरिता पालिकेने निविदा मागविल्या आहेत़ २१ जुलै दु़ ३ वाजेपर्यंत आॅनलाईन पद्धतीने इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे़
या ४७ वाहनतळांवर पाच हजार ६५० चारचाकी आणि दोन हजार ५४७ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे़ यामध्ये पहिल्यांदाच सायकल पार्किंगची सोय करण्यात आली आहे़ निविदेमध्ये तसा समावेश करुन ही पार्किंग सायकलस्वारांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे़ या वाहनतळाच्या माध्यमातून पालिकेला दरमहा एक कोटी १४ लाख ३१ हजार रुपये महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.

या ठिकाणी सायकलची मोफत पार्किंग
हुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉर्इंट, बलार्ड इस्टेट़़.

वाहनतळाची क्षमता
सरकारी व खाजगी कार्यालयांमुळे अतिवर्दळीचा व उच्चभ्रू ठरलेल्या या विभागामध्ये ४७ वाहनतळ आहेत़ या वाहनतळामध्ये आठ हजार १९७ वाहनांचे पार्किंग शक्य आहे़

४७० सायकलला मोफत पार्किंग
या वाहनतळावर प्रत्येकी दहा याप्रमाणे ४७० सायकलला मोफत पार्किंग उपलब्ध होणार आहे़

यावर करावा अर्ज़..
http://portal.mcgm.gov.in...www.mcgm.gov.in यावर इच्छुकांना निविदा भरता येणार आहे़ या प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या ठेकेदाराला सुरक्षा ठेवेसह सहा महिन्यांची बँक गॅरेंटी देणे मात्र बंधनकारक असणार आहे़

 

Web Title: For the first time free parking in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.