मुंब्य्राच्या इतिहासात प्रथमच हिंदू-मुस्लीमांमध्ये रक्षाबंधन

By Admin | Published: August 18, 2016 02:48 PM2016-08-18T14:48:34+5:302016-08-18T14:48:34+5:30

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये ऐक्याची भावना आणधण्यासाठी दोन्ही समुदायांच्या बंधु भगिनींना एकत्र आणून रक्षाबंधनाचे बंध जुळवले.

For the first time in the history of Mumbra, the Rakshabandhan in Hindu-Muslims | मुंब्य्राच्या इतिहासात प्रथमच हिंदू-मुस्लीमांमध्ये रक्षाबंधन

मुंब्य्राच्या इतिहासात प्रथमच हिंदू-मुस्लीमांमध्ये रक्षाबंधन

googlenewsNext
>प्रतिनिधी 
 
ठाणे, दि. १८ -  एखाद्या प्रशासकीय अधिकाऱयाने ठरविले तर काहीही अशक्य नसते, याचा प्रत्यय आज मुंब्रा येथे आला. 27 वर्षांची परंपरा असणाऱया मुंब्रा पोलीस ठाण्यात कधीच हिंदू-मुस्लिमांमध्ये नातेसंबध निर्माण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र,  मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी गुरुवारी हिंदू-मुस्लिमांमध्ये समन्वय साधण्यासाठी या दोन्ही समुदायांच्या बंधु भगिनींना एकत्र आणून रक्षाबंधनाचे बंध जुळविले. यावेळी हिंदूंनी मुस्लिमांचे तर मुस्लिमांनी हिंदूंचे रक्षण करण्याचे वचन परस्परांना दिले.   
 
 मुंब्रा हा भाग मुस्लीमबहुल भाग आहे. त्यामुळे संवेदनशील भागांमध्ये मुंब्रा भागाची गणना होते. या ठिकाणी हिंदू-मुस्लीमांमध्ये भाईचारा असला तरीही आजवर या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कधीच रक्षाबंधनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. ही बाब ध्यानात घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच  म्हणजे 1990 नंतर  26 वर्षानी या ठिकाणी हिंदू आणि मुस्लीम भगिनींनी बोहरा आणि सुन्नी जमातच्या मौलवींना राख्या बांधल्या.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्षाबंधन कार्यक्रमामध्ये शेकडो हिंदू-मुस्लीम बंधूभगिनी सहभागी झाले होते.  
 
या संदर्भात तायडे यांनी सांगितले की,  मुंब्रा म्हटला की संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या संवेदनशील क्षेत्रामध्ये हिंदू-मुस्लिमांमध्ये कधी दंगे झाले नसले तरीही सुफ्त खदखद कायम असते. ही खदखद कायमची संपुष्टात आणण्यासाठी आणि हिंदू-मुस्लीमांमध्ये भाईचारा निर्माण करण्याची गरज होती. त्यातूनच पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच हिंदू-मुस्लिमांमध्ये रक्षाबंधनाचे बंध जुळवून आणण्याचा प्रयत्न आम्ही केला. 

Web Title: For the first time in the history of Mumbra, the Rakshabandhan in Hindu-Muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.