‘वॉटर कप’ स्पर्धेत साताऱ्यातील वेळू प्रथम
By admin | Published: August 18, 2016 02:23 AM2016-08-18T02:23:41+5:302016-08-18T02:23:41+5:30
अभिनेता आमीर खान याच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील वेळू आणि जायगाव या दोन गावांनी अनुक्रमे
मुंबई : अभिनेता आमीर खान याच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील वेळू आणि जायगाव या दोन गावांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. तर, अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील वाठोडा चांदसला तिसरा क्रमांक मिळाला.
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेकरिता आमीर खान याने ‘पाणी फाऊंडेशन’ स्थापन करून ही स्पर्धा सुरू केली होती. या संस्थेने पश्चिम महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तर मराठवाड्ययातून बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई आणि विदर्भातून अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याची निवड केली होती.
राज्यातील ११६ गावे स्पर्धेत सहभागी झाली. सर्र्वोत्कृष्ट
कार्य करणाऱ्या ग्रांमपचायतींना
५० लाख रुपयांचे पहिले, ३० लाख रुपयांचे दुसरे आणि २० लाखांचे तृतीय पारितोषिक दिले
गेले. (प्रतिनिधी)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमीर खान यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत संस्थेतर्फे ५० लाख आणि सरकारतर्फे २० लाख असे एकूण ७० लाख रुपये वेळू गावाने पटकाविले. जायगावला ३० लाख मिळाले. वाठोडा चांदस ग्रामपंचायतीला २५ लाखांचे बक्षीस देण्यात आले.
वेळू गावाला पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या श्रमदानातून मिटवली आहे आणि या यशाचे सर्व श्रेय गावकऱ्यांना जाते.
- पूनम भोसले, सरपंच, वेळू