राज्यात दुष्काळसदृश स्थितीचा पहिला बळी

By admin | Published: June 30, 2014 02:10 AM2014-06-30T02:10:39+5:302014-06-30T02:10:39+5:30

जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीने राज्यात पहिला बळी घेतला.

First victim of drought situation in the state | राज्यात दुष्काळसदृश स्थितीचा पहिला बळी

राज्यात दुष्काळसदृश स्थितीचा पहिला बळी

Next
>गेवराई (जि.बीड) :  जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीने राज्यात पहिला बळी घेतला. गेवराईचे गारपीटग्रस्त शेतकरी अंकुश देवराव कुटे (42, रा़ मारफळा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ 
तालुक्यातील मारफळा येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली़ कुटे यांना चार एकर शेती आह़े गारपिटीमुळे तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल़े त्यातच जून महिना संपत आला तरी पावसाचा मागमूस नसल्याने ऊसाला फटका बसला. त्यामुळे कुटे निराश झाले होत़े घरखर्च भागवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता़ या नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला.गारपिटीनंतर जिल्ह्यातील बारा शेतक:यांनी त्यांचे जीवन संपविले होत़े त्यातच आता जून संपत आला तरी पाऊस झालेला नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या कुटे यांनी आत्महत्या केली़ (प्रतिनिधी)

Web Title: First victim of drought situation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.