पनवेलमध्ये स्वाइन फ्लूचा पहिला बळी
By admin | Published: February 24, 2015 04:16 AM2015-02-24T04:16:48+5:302015-02-24T04:16:48+5:30
राज्यभर वेगाने पसरत असलेल्या स्वाइन फ्ल्यूने पनवेलमध्ये पहिला बळी घेतला आहे. प्रवीणा राजकुमार जितेकर (३३) असे मृत
पनवेल : राज्यभर वेगाने पसरत असलेल्या स्वाइन फ्ल्यूने पनवेलमध्ये पहिला बळी घेतला आहे. प्रवीणा राजकुमार जितेकर (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला कामोठेमध्ये राहत होती. पनवेल तालुक्यात स्वाइन फ्लूच्या संशयित रु ग्णांची संख्या २४ पर्यंत पोहचली होती. यामध्ये ५ जणांना स्वाइनची लागण झाली होती.
मागील काही दिवसांपासून कामोठेमधील एमजीएम रु ग्णालयात जितेकर दाखल होत्या. त्यानंतर त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र आजार बळावल्याने तिचा मृत्यू झाला. नवी मुंबईमध्ये स्वाइन फ्लूच्या रु ग्णांची संख्या २५ च्या वर गेलेली आहे. स्वाइन फ्ल्यूबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिका, पनवेल नगरपरिषद, सिडको प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याची खूप गरज आहे.