"मोदी राजवटीत चार महिन्यात वित्तीय तूट १०० अब्ज डॉलरवर पोहोचली", राष्ट्रवादीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 04:56 PM2022-08-04T16:56:06+5:302022-08-04T16:59:29+5:30

एकीकडे वाढती महागाई, बेरोजगारी आणि बेरोजगारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटणारे मूल्य या सर्वांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही ना अशाप्रकारची भीती नागरीक आणि तज्ज्ञांना वाटू लागली आहे असेही महेश तपासे म्हणाले. 

Fiscal deficit reached $100 billion in four months under Modi regime says NCP Mahesh tapase | "मोदी राजवटीत चार महिन्यात वित्तीय तूट १०० अब्ज डॉलरवर पोहोचली", राष्ट्रवादीचा आरोप

"मोदी राजवटीत चार महिन्यात वित्तीय तूट १०० अब्ज डॉलरवर पोहोचली", राष्ट्रवादीचा आरोप

Next

मुंबई - मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आयात - निर्यातमधील वित्तीय तूट या चार महिन्यात १०० अब्ज डॉलर झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. 

एकीकडे वाढती महागाई, बेरोजगारी आणि बेरोजगारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटणारे मूल्य या सर्वांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही ना अशाप्रकारची भीती नागरीक आणि तज्ज्ञांना वाटू लागली आहे असेही महेश तपासे म्हणाले. 

सध्याची परिस्थिती अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही त्यामुळे आपली परकीय गंगाजळी कमी होईल. सध्याच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी विरोधी पक्षातील अनुभवी लोकांना बोलावून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे व सकारात्मक मार्ग काढून मात करावी अशी विनंतीही महेश तपासे यांनी केली आहे.
 
Web Title: Fiscal deficit reached $100 billion in four months under Modi regime says NCP Mahesh tapase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.