शिवस्मारक जागेवरून मच्छीमार आक्रमक

By Admin | Published: November 5, 2016 02:00 AM2016-11-05T02:00:06+5:302016-11-05T03:57:14+5:30

शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याच्या जागेहून अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने शुक्रवारी विरोधप्रदर्शन केले आहे.

Fisherman aggressor from Shivmankar place | शिवस्मारक जागेवरून मच्छीमार आक्रमक

शिवस्मारक जागेवरून मच्छीमार आक्रमक

googlenewsNext

 मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याच्या जागेहून अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने शुक्रवारी विरोधप्रदर्शन केले आहे. हरित लवादात याचिका दाखल केल्यानंतरही सरकार टेंडर काढत असल्याची नाराजी कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी व्यक्त केली. 
तांडेल म्हणाले की, प्रकल्पासाठी लागणाऱ्या हजारो कोटी रुपयांमध्ये टक्केवारी हवी असल्याने भारतीय जनता पार्टी आणि आमदार विनायक मेटे प्रकल्प राबवण्याची घाई करत आहेत. मुळात हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेतील सुनावणीवर स्मारकासाठी निवडलेल्या जागेवर मासेमारी होत नसल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. याउलट संबंधित ठिकाणी १५० प्रकारच्या समुद्री जीवांचे वास्तव्य आहे. केवळ ४० प्रजातीचे खेकडे या परिसरात आढळतात. याशिवाय डॉल्फीन, लॉब्स्टर आणि अन्य माश्यांच्या प्रजाती याठिकाणी मिळतात. तरीही सरकारने लवादासमोर दिलेले स्पष्टीकरण हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपने शिवस्मारकाची जागा बदलली नाही, तर येत्या सर्व निवडणुकांत भाजपला मतदान न करण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतल्याचेही तांडेल यांनी सांगितले. शिवाय प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम पाच हजार मच्छीमार बोटींनी घेराव घालून कृती समिती उधळून लावेल, असा इशाराही तांडेल यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
>समुद्री जीवांचे वास्तव्य
भाजपाने शिवस्मारकाची जागा बदलली नाही, तर येत्या सर्व निवडणुकांत भाजपाला मतदान न करण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतल्याचेही तांडेल यांनी सांगितले.
संबंधित ठिकाणी १५० प्रकारच्या समुद्री जीवांचे वास्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Fisherman aggressor from Shivmankar place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.