मच्छिमार बोट समुद्रात बुडाली, १४ जणांना वाचवण्यात यश
By Admin | Published: September 18, 2016 02:03 PM2016-09-18T14:03:49+5:302016-09-18T14:03:49+5:30
मुंबईपासून ३० नॉटीकल मैल अंतरावर दत्त साई ही बोट बुडाली आहे. खराब हवामानामुळे शनिवारी सकाळी ही बोट बुडाली. या बोटीत १७ मच्छिमार होते त्यापैकी १४ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ : मुंबईपासून ३० नॉटीकल मैल अंतरावर दत्त साई ही बोट बुडाली आहे. खराब हवामानामुळे शनिवारी सकाळी ही बोट बुडाली. या बोटीत १७ मच्छिमार होते त्यापैकी १४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र तीन मच्छिमार अदयाप बेपत्ता आहेत. मच्छिमारांच्या शोधासाठी गेलेले नौदलाचे दोन डायव्हर्सही बेपत्ता झाल्याने चिंतेत भर पडली.
मात्र रविवारी सकाळी दोन्ही डायव्हर्सचा शोध घेण्यात यश आल्याने नौदलाने सुटकेचा श्वास घेतला. तटरक्षक दल, नौदल आणि ओनजीसी जवानांनी ही शोधमोहीम हाती घेतली आहे. ऑपरेशन सार या नावाने ही मोहीम राबवली जात होती.
खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र अशा स्थितीतही या दोन डायव्हर्सनी समुद्रात संपूर्ण रात्र काढली. उर्वरित तिघा मच्छिमारांचा अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही. त्यांचा शोध सुरुच आहे.