शिवस्मारक भूमिपूजनाला विरोध करण्यास जाणा-या मच्छिमार नेत्यांना अटक

By admin | Published: December 24, 2016 10:49 AM2016-12-24T10:49:45+5:302016-12-24T10:49:45+5:30

पंतप्रधान नरेंद मोदींच्याहस्ते होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या भूमिपूजनाचा निषेध करण्यासाठी जाणा-या मच्छिमारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Fishermen leaders who are opposed to Shivsmarka Bhoomipujja are arrested | शिवस्मारक भूमिपूजनाला विरोध करण्यास जाणा-या मच्छिमार नेत्यांना अटक

शिवस्मारक भूमिपूजनाला विरोध करण्यास जाणा-या मच्छिमार नेत्यांना अटक

Next

ऑनलाइन लोकमत

मीरा रोड (ठाणे), दि. २४ -  पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाठिकाणी निषेध करण्यासाठी निघलेले अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक बर्नड डिमेलो यांच्यासह 5 मच्छीमारांना उत्तन सागरी पोलिसांनी उत्तन नाका येथून ताब्यात घेतले. स्मारकासाठी समुद्रात ४२ एकरात होणाऱ्या भरावामुळे मसेमारी वर मोठा विपरीत परिणाम होऊन मच्छीमार उध्वस्त होण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली.  

सुरवातीला अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने निषेध करण्याचा निर्णय घेतला होता. पण मच्छीमार संघटनां मध्ये फूट पाडण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले आणि  महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने विरोध करण्याचा निर्णय मागे घेतला.  अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मात्र विरोध करण्याचा पावित्रा कायम ठेवला.  

 
वांद्रे येथे आज शनिवारी होत असलेल्या भूमिपुजनाच्या कार्यक्रम ठिकाणी मच्छीमारांचा विरोध होण्याची शक्यता पाहता उत्तन सागरी पोलिसांनी परिसरातील मच्छीमार नेते व पदाधिकारी यांना कलम 149 च्या प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. पोलिस मच्छीमार नेते व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर लक्ष ठेऊन होते. आज सकाळी बर्नड डिमेलो हे आपल्या गाडीतून काही मच्छीमार कार्यकर्त्यांसह उत्तन नाक्यावर पोहचतच पोलिस ठाण्याच्या प्रभारी सरोजना मोकलीकर व पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 
 
मच्छीमारांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकार घटनेने दिले अधिकार हिसकावून घेत असून दडपशाही करत असल्याचा आरोप येथील मच्छीमारांनी केलाय.

Web Title: Fishermen leaders who are opposed to Shivsmarka Bhoomipujja are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.