आठ पर्यटकांना मच्छीमारांनी वाचविले
By admin | Published: March 14, 2016 01:38 AM2016-03-14T01:38:55+5:302016-03-14T01:38:55+5:30
केळवे बीच वरील पानकोट या समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या ऐतिहासिक किल्ल्यात गेलेल्या व भरतीच्या विळख्यात सापडलेल्या वाझ येथील
हितेन नाईक, पालघर
केळवे बीच वरील पानकोट या समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या ऐतिहासिक किल्ल्यात गेलेल्या व भरतीच्या विळख्यात सापडलेल्या वाझ येथील चार मुले व चार मुली यांना वाचविण्यात केळवे येथील मच्छीमार तरु णांना यश आले आहे.
पालघर तालुक्यातील शांत आणि निर्धोक असा समुद्र किनारा तसेच बागायती क्षेत्रासह जागृत शितलाई देवीचे देवस्थान म्हणून केळवे बीच सर्वत्र प्रसिद्ध आहे. शनिवार-रविवार तसेच सलग सुट्टीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने बाराही महीने या बीच वर मोठी गर्दी असते. आज वाझ येथून १५ते १८ वयोगटतील चार मुले आणि चार मुली केळवे बीच वर फिरण्यासाठी आल्या होत्या. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ही मुले समुद्राने वेढलेल्या पानकोट हा किल्ला पाहण्यासाठी ओहोटी असताना किल्ल्यात गेले. ते आत असतानाच भरती सुरु झाली. ते त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु किनाऱ्यावर असलेले केळवे मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष हरेश्वर तांडेल यांना संकटाची चाहूल लागल्या बरोबर त्यानी सरळ किनाऱ्यावर बसलेल्या गणेश तांडेल, हरेश्वर तांडेल, भूषण तांडेल, नयन तांडेल इ. तरुणांना कल्पना देवून सरळ समुद्राच्या पाण्यात झेप घेतली. भरतीच्या पाण्याला आलेल्या मोठ्या प्रवाहाची पर्वा न करता त्यांनी आपापसात खेळण्यात मग्न असलेल्या त्या तरु णांना त्यांच्या समोरील संकटाची ओरडून कल्पना दिली. आपल्या सभोवताली वाढलेला भरतीच्या पाण्याचा वेढा पाहून ते भयभीत झाले. त्या सर्व मच्छीमारांनी त्यांना दिलासा देत मानवी साखळी तयार करु न त्या आठ तरुणांना छाती भर पाण्यातून सुखरूप पणे बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करायला कोणीही पुढे आले नसले तरी संकटग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना या तरु णानी व्यक्त केली. केळवे हे दिवसेंदिवस पर्यटकांच्या दृष्टीने आवडते ठिकाण असून पर्यटकांचा ओघ वाढत आहे.