शिशुगृहातून पाच बालकेगायब
By admin | Published: January 21, 2015 01:38 AM2015-01-21T01:38:23+5:302015-01-21T01:38:23+5:30
शहरातील हालगेगल्लीतील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्व. सेठ नेमीचंद दीपचंद बडेरा शिशुगृहातील पाच बालक गायब असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली.
परळी : शहरातील हालगेगल्लीतील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्व. सेठ नेमीचंद दीपचंद बडेरा शिशुगृहातील पाच बालक गायब असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली. परळी पोलिसात यासंदर्भात तक्रार देण्यात येणार असल्याचे बालकल्याण समितीचे दत्ता नलावडे यांनी सांगितले.
असाह्ण, बेघर बालकांचे संगोपन करणारी व अनाथाचा नाथ म्हणून या शिशुगृहाची ख्याती आहे. येथे ० ते ६ वयोगटातील निराधार बालकांचे संगोपन करण्यात येते. नियमित तपासणीसाठी बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकाऱ्यांनी शनिवारी भेट दिली़ तेव्हा ही माहिती उघडकीस आली. शिशुगृहाच्या रेकॉर्डवर ११ बालक असल्याची नोंद होती.
प्रत्यक्षात ६ बालक असल्याचेच समितीच्या लक्षात आले. इतर पाच बालके कोठे आहेत, याबाबत विचारणा केली असता शिशुगृहातील कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तर
देता आले नाही. त्यामुळे त्यांनी
हा प्रकार जिल्हाधिकारी व
पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिला.
तात्पुरत्या स्वरुपात दत्तक दिली
शिशुगृहातील पाच बालक तात्पुरत्या स्वरुपात राजस्थान, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील मोठ्या व्यक्तींकडे दत्तक दिली, तर एका बालकावर हैद्राबाद येथे उपचार
सुरू असल्याचे महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनचे सचिव (जालना) चे वीरेंद्रप्रसाद धोका यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
च्महाराष्ट्रात आमच्या संस्थेच्या वतीने जालना, जळगाव आणि परळी येथे शिशुगृह चालविण्यात येतात. यात कोणताही चुकीचा प्रकार घडलेला नाही. आमच्याकडे बालक दत्तक घेण्यासाठी ४५० जणांची प्रतीक्षा यादी आहे. ही बालके गायब झालेली नाहीत तर ती संस्थेने तात्पुरत्या स्वरूपात दत्तक दिली आहेत. ही सर्व बालके सुरक्षित असल्याचे मारवाडी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव वीरेंद्र धोका यांनी सांगितले.
दत्तक परवानाच नाही
मुले दत्तक द्यायचेच असेल तर कुटुंबाची सर्व माहिती घेऊनच संस्थेला परवानगी देण्यात येते. बालगृहातील मुले अशी दत्तक देताना त्यासाठी शासनाचा परवाना त्या संस्थेकडे आवश्यक असतो. सध्या असा परवानाच नाही. २०१३ साली परवान्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी पुन्हा असा परवाना घेतलेला नसल्याचे बालकल्याण समितीचे अध्यक्ष दत्ता नलावडे यांनी सांगितले.
परळीतील बडेरा शिशुगृहात २००९ ते २०१५ या कालावधीत ७३ असाह्ण, बेघर बालकांचे संगोपन करण्यात आले. ७३ पैकी ४५ बालक कायदेशीररीत्या दत्तक देण्यात आले आहेत. ४ बालके इतर संस्थांकडे स्थलांतरीत करण्यात आले, तर सहा बालकांचा मृत्यू झाला आहे.
११ बालकांपैकी एका बालकाला उपचारासाठी हैदराबादला दाखल केले आहे, तर चौघांना दत्तक दिली आहेत. यात कोणताही गैरप्रकार नसून मुलांना दत्तक देण्यासाठी बालकल्याण समितीकडे प्रस्ताव दिलेला होता असे शिशुगृहाचे काळजीवाहक गजानन शिंदे यांनी दिली.