खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर पाच कारचा विचित्र अपघात

By admin | Published: March 6, 2017 08:53 PM2017-03-06T20:53:04+5:302017-03-06T20:53:04+5:30

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील साताऱ्याकडून पुण्याकडे जाताना खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर दुसऱ्या वळणावर पाच कारचा विचित्र

Five car's strange accident after crossing the Khambataki tunnel | खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर पाच कारचा विचित्र अपघात

खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर पाच कारचा विचित्र अपघात

Next
>आॅनलाईन लोकमत
खंडाळा (सातारा),  दि. 6 -  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील साताऱ्याकडून पुण्याकडे जाताना खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर दुसऱ्या वळणावर पाच कारचा विचित्र अपघात झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला. यामध्ये कोणीही जखमी नसले तरी सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर दुसऱ्या वळणावर कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एफझेड १९६५) ही महामार्गावर पलटी झाली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक संथगतीने सुरू होती. कारच्या बाजूने पुढे जाण्याचा इतर वाहनांचा प्रयत्न सुरू होता. त्याचवेळी बोगदा ओलांडून भरधाव येत असलेला कंटेनर (एनएल ०१ जी ८२३१) वरील चालकाला अपघाताचा अंदाज न आल्याने उजव्या बाजूने त्याच वेगात कंटेनर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तेथील तीव्र उतारामुळे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने चार कारला पुढे रेटत चिरडले. 
त्यामध्ये कार (एमएच ०९ बीएम ८९९६, एमएच ११ बीव्ही ३०११, एमएच १२ केएन १२६७ व एमएम ०४ एचएन ०४१६) या कारचे मोठे नुकसान झाले. या वाहनांमधून सोळाजण प्रवास करत होते. त्यांना कसलीही इजा झाली नाही. अभिषेक रोडलाईन्सचा हा कंटेनर चार कारला धडक देत महामार्गाच्या बाजूच्या संरक्षक कठड्याला जाऊन धडकला. 
अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पोलिस हवालदार व्ही. एच. पिसाळ, अविनाश बाबर, बी. सी. मुठे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने सर्व गाड्या बाजूला काढल्या. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अवजड कंटेनर बाजूला काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 
 
‘एस’ वळणावरही कंटेनर पलटी
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावरही सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास कंटेनर (एमएच ४६ एआर ८०९४) हा पलटी झाला. यामध्ये दोघे जखमी झाले. हनुमंत प्रल्हाद चव्हाण (वय २८) व अधिक जयवंत कोंडगे (रा. औंदी, ता. जत, जि. सांगली) हे दोघे जखमी झाले. 
 
टायरही फुटले
कंटेनरने सलग चार कारला धडक दिली. यामध्ये वाहनांचे टायर फुटले. बाह्यभाग चेपला गेला. मात्र, कोणतीही कार पलटी झाली नाही. किंवा महामार्गावरून खड्ड्यात गेली नाही. त्यामुळे अनर्थ टळला.

Web Title: Five car's strange accident after crossing the Khambataki tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.