स्मार्ट सिटीसाठी महाराष्ट्रातल्या 5 शहरांची निवड

By admin | Published: September 20, 2016 04:49 PM2016-09-20T16:49:13+5:302016-09-20T16:49:50+5:30

राज्यातल्या औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, नाशिक, ठाणे आणि नागपूर या पाच शहरांची स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे

Five cities in Maharashtra are selected for Smart City | स्मार्ट सिटीसाठी महाराष्ट्रातल्या 5 शहरांची निवड

स्मार्ट सिटीसाठी महाराष्ट्रातल्या 5 शहरांची निवड

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - राज्यातल्या औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, नाशिक, ठाणे आणि नागपूर या पाच शहरांची स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये देशातल्या 67 शहरांची निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली असून या स्पर्धेत बाजी मारलेल्या शहरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
याआधी स्मार्ट सिटी संकल्पनेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, "स्मार्ट सिटीमुळे सेवा आणि व्यवस्था पारदर्शी व गतीमान होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहेत. यासोबतच समाजाच्या सर्व स्तरांना आणि विशेषत: गरीबांना स्थान मिळतेय. आजवर श्रीमंतांना सेवा मिळत आली आहे. मात्र, आता सर्वसामान्य आणि गरिबांनाही सेवा मिळणार आहे. त्यांचा विकास होईल अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. शहरात इंफ्रास्ट्रकचर तयार करणारा कार्यक्रम नाही तर ट्रान्सफॉर्म करणारा कार्यक्रम, ज्यामुळे तरुणांना रोजगार मिळणार आहे."

Web Title: Five cities in Maharashtra are selected for Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.