राज्यातील पाच शहरे हागणदारीमुक्त

By admin | Published: September 1, 2016 06:04 AM2016-09-01T06:04:04+5:302016-09-01T06:04:04+5:30

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत राज्यातील पाच शहरांचा समावेश आहे

Five Cities in the State are Handicapped | राज्यातील पाच शहरे हागणदारीमुक्त

राज्यातील पाच शहरे हागणदारीमुक्त

Next

मुंबई/कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत राज्यातील पाच शहरांचा समावेश आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, मुरगूड, पन्हाळा तर वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) आणि पाचगणी (जि. सातारा) या शहरांचा समावेश आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
हागणदारीमुक्त झालेल्या देशातील पहिल्या १0 शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने बुधवारी जाहीर केली. यात तेलंगणामधील सिद्दीपेठ, सदनगा, सूर्यापेठ, अचमपेठ आणि हुजूनगर या शहरांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Five Cities in the State are Handicapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.