दरोडेखोरांच्या हल्ल्यात पाच गंभीर जखमी

By Admin | Published: September 10, 2016 04:44 AM2016-09-10T04:44:39+5:302016-09-10T04:44:39+5:30

गौरींच्या पूजनानंतर घरात झोपलेल्या महिलांसह पाच जणांना दरोडेखोरांनी लोखंडी गज, सत्तूर, दगडाने जबर मारहाण करून लाखाचा मुद्देमाल लंपास केला़

Five critically wounded in the attack of dacoits | दरोडेखोरांच्या हल्ल्यात पाच गंभीर जखमी

दरोडेखोरांच्या हल्ल्यात पाच गंभीर जखमी

googlenewsNext


वाशी (जि. उस्मानाबाद) : गौरींच्या पूजनानंतर घरात झोपलेल्या महिलांसह पाच जणांना दरोडेखोरांनी लोखंडी गज, सत्तूर, दगडाने जबर मारहाण करून लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वाशी तालुक्यातील इंदापूर येथे घडली़ या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हनुमंत मणिक गपाट, उमा गपाट, संदिपान गपाट, मंजुबाई गपाट व शिवाजी गपाट (सर्व रा. इंदापूर ता. वाशी) अशी जखमींची नावे आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चार दरोडेखोर घरात घुसले़ विरोध करणाऱ्यांना त्यांनी लोखंडी गजाने जबर मारहाण केली. यात हनुमंत यांच्या पत्नी उमा गंभीर जखमी झाल्या़ दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. रडण्याचा आवाज आल्याने आजूबाजूचे लोक येत असल्याचे दिसताच दरोडेखोर बाजूच्या शेतात पळून गेले.
थोड्या वेळाने हनुमंत यांच्या घरापासून जवळच असलेल्या संदीपान गपाट यांच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश केला़ यावेळी संदीपान यांच्या पत्नी मंजुबाई यांना जबर मारहाण केली़, तर विनायक गपाट यांच्यावर दगडफेक केल्यामुळे तेही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन्ही घरांतील अनुक्रमे रोख ४४ हजार रूपये व ४६ हजार रुपयांचे दागिने असा एकूण ९० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचे नमूद करण्यात आले आहे़ पोलीस सकाळी साडेआठच्या सुमारास घटनास्थळी आले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनीही घटनास्थळाची पाहणी केली़ (वार्ताहर)
ग्रामस्थांवर दगडफेक
आरडाओरड्यामुळे जागे झालेले काही युवक, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दरोडेखोरांनी दगडफेक केल्याने काहीजण किरकोळ जखमी झाले़
इंदापूर ते गोलेगाव रस्त्यावरील विनायक गपाट यांच्या गोठ्यात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांच्या हाती काहीच
लागले नाही़

Web Title: Five critically wounded in the attack of dacoits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.