पाच दिवसांनंतर अखेर डॉक्टर ‘आॅनड्युटी’

By admin | Published: March 26, 2017 03:21 AM2017-03-26T03:21:37+5:302017-03-26T03:21:37+5:30

संप मागे घेतल्यानंतर सहाव्या दिवशी निवासी डॉक्टर कामावर रूजू झाले आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत

Five days later, the doctor 'induction' | पाच दिवसांनंतर अखेर डॉक्टर ‘आॅनड्युटी’

पाच दिवसांनंतर अखेर डॉक्टर ‘आॅनड्युटी’

Next

मुंबई : संप मागे घेतल्यानंतर सहाव्या दिवशी निवासी डॉक्टर कामावर रूजू झाले आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व डॉक्टर कामावर रूजू होतील, असे आश्वासन मार्डने दिले होते. त्यामुळे मागच्या काही दिवसांत ‘व्हेंटीलेटर’वर असलेली रुग्णसेवा हळूहळू सुरळीत होत असल्याचे दिसून आले.
डॉक्टरांच्या संपामुळे लांबणीवर गेलेल्या शस्त्रक्रियांचे वेळापत्रक ही पूवर्वत होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यात शनिवारी बाह्यरुग्ण कक्षविभाग सुरू झाल्यावर केईएममध्ये बाह्यरुग्ण विभागात २ हजार ३८२ रुग्ण आले, तर त्यातील ६०७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे, लहान-मोठ्या अशा एकत्रितपणे ११२ शस्त्रक्रिया रुग्णालयात झाल्याची माहितीही डॉ.सुपे यांनी ‘लोकमत’ला दिली. केईएम रुग्णालयात शनिवारी सकाळी निवासी डॉक्टरांनी एकत्र येऊन कामावर रुजू होण्यास तयारी दर्शविली. शिवाय, यावेळी आता तरी डॉक्टरांच्या सुरक्षेची तरतूद आणि प्रलंबित मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.(प्रतिनिधी)

Web Title: Five days later, the doctor 'induction'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.