‘सवाई’ची मेजवानी यंदा पाच दिवस
By admin | Published: October 8, 2016 04:05 AM2016-10-08T04:05:46+5:302016-10-08T04:05:46+5:30
सूर, लय, ताल अशा त्रिवेणी संगमातून पुण्यात साकार होणारा ‘सवाई गंधर्व- भीमसेन संगीत महोत्सव’ रसिकांसाठी आनंदाची पर्वणीच असतो.
पुणे : सूर, लय, ताल अशा त्रिवेणी संगमातून पुण्यात साकार होणारा ‘सवाई गंधर्व- भीमसेन संगीत महोत्सव’ रसिकांसाठी आनंदाची पर्वणीच असतो. देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘सवाई’ ची मेजवानी रसिकांना यंदा पाच दिवस मिळणार आहे.
रविवार सकाळचे सत्र रद्द करीत सायंकाळच्याच सत्रांतच हा महोत्सव होणार असून, आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे रविवारऐवजी शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याची विनंती करण्यात येणार आहे.
यंदाचा सवाई गंधर्व -भीमसेन संगीत महोत्सव ७ ते ११ डिसेंबर दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे रंगणार आहे. महोत्सवाचे यंदाचे हे ६४ वे वर्ष आहे.
यावर्षी हा महोत्सव चारऐवजी पाच दिवस होणार आहे. रविवार सकाळचे सत्र यावर्षी रद्द करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)