पाच शेतक:यांची विदर्भात आत्महत्या
By Admin | Published: November 11, 2014 01:19 AM2014-11-11T01:19:47+5:302014-11-11T01:19:47+5:30
कजर्बाजारीपणाला कंटाळून विदर्भात गेल्या दोन दिवसांत पाच शेतक:यांनी आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आल़े
नागपूर : कजर्बाजारीपणाला कंटाळून विदर्भात गेल्या दोन दिवसांत पाच शेतक:यांनी आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आल़े
गोंदिया जिल्ह्यातील खोकरी येथे कजर्फेडीच्या विवंचनेतून चंदू उरकुडा निंबार्ते (70) या शेतक:याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्यावर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे 5 लाख 37 हजार 375 रुपयांची थकबाकी होती.
अमरावती येथील नरसिंगपूर येथे नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून विठ्ठलराव गुलाबराव अढाऊ (65) यांनी शुक्रवारी शेतातच विष प्राशन करुन आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला.
यवतमाळ जिल्ह्यातील लासीना येथे कर्जाच्या चिंतेने प्रवीण दामोधर गोहणो (35) या शेतक:याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आल़े त्यांच्यावर जिल्हा बँकेचे 5क् हजार आणि काही खासगी कर्ज आहे. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुले व मोठा परिवार आहे. यवतमाळ जिलतील आर्णी तालुक्यातील वरुडभक्त येथे शामराव शिंगनजुडे (5क्) यांनी मक्त्याने शेती केली होती. मात्र सोयाबीनचे पीक बुडाल्याने विमनस्क अवस्थेत घरातच विष प्राशन करून आत्महत्या केली. लोणी येथील सखाराम रामटेके (65) यांनी घरी कुणी नसताना विषारी औषध घेतले. ही बाब लक्षात येताच तात्काळ लोणी प्राथमिक उपचार करण्यात आले. यवतमाळ येथे हलविताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे सेंट्रल बँकेचे 7क् हजारांचे कर्ज आहे. (लोकमत न्यूजनेटवर्क)