वारीमध्ये पाच पिढ्यांची शतकोत्तरी वाटचाल

By admin | Published: July 12, 2015 12:07 AM2015-07-12T00:07:58+5:302015-07-12T00:07:58+5:30

पंढरीच्या वारीमध्ये लाखो भाविक एका अनामिक श्रद्धेने वर्षानुवर्षे सहभागी होतात. ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या फड परंपरेच्या दिंडीला १०१ वर्षे पूर्ण होत आहे.

The five generations will go on a hundred steps in Vari | वारीमध्ये पाच पिढ्यांची शतकोत्तरी वाटचाल

वारीमध्ये पाच पिढ्यांची शतकोत्तरी वाटचाल

Next

बाबामहाराज सातारकर : फड परंपरेला १0१ वर्षे पूर्ण, पाचवी पिढीही सहभागी

पुणे : पंढरीच्या वारीमध्ये लाखो भाविक एका अनामिक श्रद्धेने वर्षानुवर्षे सहभागी होतात. ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या फड परंपरेच्या दिंडीला १०१ वर्षे पूर्ण होत आहे. सातारकर कुटुंबीयांची पाचवी पिढीही वारीमध्ये सहभागी होत आहे. १९१४ मध्ये बाबामहाराजांचे आजोबा दादामहाराज यांनी पहिली दिंडी काढली. ती परंपरा अविरतपणे चालू आहे. दिंडीत दोन हजारांपेक्षा जास्त वारकरी आहेत. बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान या ट्रस्टच्या वतीने या सर्व वारकऱ्यांची देखभाल केली जाते. ट्रस्टतर्फे दररोज पोळी, भाजी, भात, आमटीचा आहार पुरवला जातो. या वर्षी दिंडीला १०१ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यात पकवान्नाची ही भर पडणार आहे. वारकऱ्यांना जेवण बनविण्यासाठी १० आचारी, चपाती लाटण्यासाठी ३० महिला आणि सेवा देण्यासाठी स्वयंसेवक दिंडीसोबत असतात. दिंंडीतील प्रत्येक वारकऱ्यास ओळखपत्र दिले जाते. त्या वारकऱ्यांची माहिती दिंंडीत असते. फॉर्म भरून घेतले जातात. त्यांच्या फोटोसह माहिती संग्रही ठेवली जाते. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यातील महाराजांचे शिष्यही वारीत सहभागी होतात. (प्रतिनिधी) वारीमधील सुख- सुविधांमध्ये बदल झाला आहे. पूर्वी वारकरी बैलगाड्यांमध्ये पंढरपूरला जायचे. आता मोठ-मोठे ट्रक आहेत. मात्र, मूळ भावना भक्ती, श्रद्धा बदललेली नाही. तरूणांचा सहभाग वाढला आहे. वारकरी संप्रदाय तरूणांनी स्थापन केला आहे, म्हाताऱ्यांनी नाही. - बाबामहाराज सातारकर विशेष म्हणजे ही शिष्यमंडळी मराठी, तमिळ, कन्नड आणि तेलुगू या वेगवेगळ््या भाषेत कीर्तन, भजन गातात. या दिंंडी सोहळ्यात भगवतीताई दांडेकर-सातारकर, चिन्मयमहाराज सातारकर पालखी सोहळ्याबरोबर असतात. दिंंडीच्या मुक्कामी बाबामहाराजांचे कीर्तन होत असते. त्याचप्रमाणे दररोज प्रवचन होत असते.

Web Title: The five generations will go on a hundred steps in Vari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.