पाच ग्रामपंचायती होणार महापालिकेत समाविष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2016 02:56 AM2016-09-19T02:56:01+5:302016-09-19T02:56:01+5:30
पनवेल तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत महापालिकेत समाविष्ट होण्याची तयारी दर्शविली
पनवेल : पनवेल महानगरपालिका स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असतानाच अनेक गावांनी महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध दर्शवला आहे. मात्र पनवेल तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत महापालिकेत समाविष्ट होण्याची तयारी दर्शविली आहे. यात तळोजा, ओवे, तळोजा मजकूर, पडघे, आसुडगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
पनवेल नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होत असून, त्यात ग्रामीण भागाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गावांनासुद्धा सर्वांगीण विकासाची आस लागली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पनवेल महापालिकेत समाविष्ट होण्याची तयारी दर्शविली आहे. ग्रामसभेत याबाबत एकमताने ठराव करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)