पाचशेला तीनशेचा; हजाराला सातशेचा भाव

By admin | Published: November 10, 2016 02:15 AM2016-11-10T02:15:27+5:302016-11-10T02:15:27+5:30

एक हजार, पाचशे रुपयांच्या हव्या तेवढ्या नोटा आहेत, परंतु सुटे पैसे नसल्यामुळे बुधवारी नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नव्हते

Five hundred; Thousands of Hazareas | पाचशेला तीनशेचा; हजाराला सातशेचा भाव

पाचशेला तीनशेचा; हजाराला सातशेचा भाव

Next

पुणे : एक हजार, पाचशे रुपयांच्या हव्या तेवढ्या नोटा आहेत, परंतु सुटे पैसे नसल्यामुळे बुधवारी नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नव्हते. याच संधीचा फायदा घेत काहींनी शहरातील काही ठिकाणी १००० हजार रुपयांच्या बदल्यात ७०० रुपये, तर ५०० रुपयांच्या बदल्यात ३०० रुपये सुटे देण्याचा अनधिकृत व्यवसायच उघडल्याचे दिसून आले. परिणामी अडचणीत सापडलेल्या काही नागरिकांची आर्थिक लूट झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास १०००हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शहरात मंगळवारी रात्रीपासूनच सुटे पैसे मिळवण्याच्या प्रक्रियेला वेग आला. एटीएमसमोर व पेट्रोलपंपावर मोठ्या रांगा लागल्या होत्या.
ज्यांना सुटे पैसे मिळाले नाहीत त्यांना सकाळी चहा नाश्त्यासाठी सुटे पैसे नव्हते. त्याच प्रमाणे प्रवाशांनाही रिक्षाने प्रवास करण्यासाठी सुट्या पैशांची उणीव भासत होती. त्यामुळे काही नागरिकांनी सुटे पैसे देऊन नागरिकांना लुटले. अनेक नागरिकांना १००० च्या नोटेला ७०० चा, तर ५०० च्या नोटेला ३००० रुपयांचा भाव मिळाला.
चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी आलेले ग्राहक ५०० रुपयांची नोट देत असेल, तर सुटे नसल्यामुळे त्यांना पाचशे रुपयांच्या बदल्यात तीनशे किंवा चारशे रुपये दिले जात होते. तर हजाराच्या नोटेला 700 ते 800 रुपये दिले जात होते.
नागरिकांना पूर्व कल्पना देऊन हा निर्णय घ्यायला हवा होता, असे पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयाचे अनिल अगावणे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Five hundred; Thousands of Hazareas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.